सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील मरवडे इथल्या सुरेश पवार यांच्या छत्रपती परिवार यांच्यावतीने दिला जाणारा स्वच्छ शाळा, सुंदर शाळा हा जिल्हास्तरीय पुरस्कार उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस मिळाला. कारंबा शाळेने आजवर केलेले विविध उपक्रम, शाळेची गुणवत्ता, क्रीडाक्षेत्रात मिळवलेली विविध बक्षिसे, शाळेत करण्यात आलेले वृक्षारोपन या सर्व बाबींचा विचार करुन हा पुरस्कार देण्यात आला.
शाळेचा परिसर संपूर्ण हिरवागार असून शाळेत सुमारे २१० झाडे आहेत. शाळेत प्रवेश करताच एखाद्या उद्यानात आल्याचा आभास होतो असे गौरवोद्गार आयोजकांनी काढले. या पुरस्कार वितरण सोहळ्यास कारंबा गावातील अनेक प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.
हा पुरस्कार विनायक सुतार, सत्तार शेख,मल्लिनाथ तंबाके,महेश पेंडपाले, अस्लम शेख,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय आदाटे, उपाध्यक्ष निलेश कांबळे,राजा कदम,लक्ष्मण माने,शबाना अस्लम शेख,मुख्याध्यापिका संगीता गायकवाड, प्रविण घोडके, सचिन घुगे, सोमनाथ मिसाळ,मंदाकिनी शिंदे,लता सूर्यवंशी यांनी पुरस्कार स्विकारला.




















