Sunday, March 22, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

Solapur : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन ; मतदान ओळखपत्राला आधार क्रमांक जोडणी करा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
21 August 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 







सोलापूर,दि.21(जिमाका) : मतदान ओळखपत्राशी  आधार कार्ड संलग्न करण्यासाठी विशेष मोहीम 1ऑगस्ट 2022 पासून राबविण्यात येत आहे. जास्तीत जास्त मतदारांनी या प्रक्रियेत सहभाग नोंदवून आधार क्रमांक मतदान ओळखपत्राशी जोडून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी श्री शंभरकर यांनी आज सांगोला आणि मंगळवेढा तालुका दौरा केला. सांगोला तालुक्यातील वाकी, घेरडी येथील मतदान केंद्राना भेटी देवून पाहणी केली. पंचायत समिती सभागृहात केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांची आढावा बैठक घेतली. आधारकार्ड मतदान ओळखपत्राशी जोडण्याची मोहीम प्रभावीपणे राबवून 10 दिवसात काम संपविण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी तहसीलदार अभिजित पाटील उपस्थित होते.


दरम्यान श्री शंभरकर यांनी मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ, गोणेवाडी, शिरसी येथील मतदान केंद्राना भेटी देवून माहिती घेतली. तसेच 1500 पेक्षा जास्त मतदार असलेल्या न्यू इंग्लिश स्कूल आणि नगरपालिका शाळेतील मतदान केंद्राची पाहणी करून मतदार संख्या कमी करण्याविषयी सूचना केल्या. यावेळी प्रांतधिकारी गजानन गुरव, तहसीलदार सुशील बेल्हेकर, तहसीलदार स्वप्नील रावडे उपस्थित होते.


पाहणीनंतर तहसील कार्यालयात महसूल अधिकारी, बीएलओ यांची आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये मतदार याद्यांचे प्रमाणीकरण, दुबार नावे वगळणे यासाठी निवडणूक आयोगातर्फे मतदान ओळखपत्र आधार कार्डाशी लिंक करण्याची विशेष मोहीम सुरु केली आहे. बैठकीत उपस्थित ग्रामस्थांचे श्री शंभरकर यांनी स्वतः आधार लिंकिंग करवून घेतले.


मतदार यादीतील नोंदींचे प्रमाणीकरण करणे आणि एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदारसंघात एकाच व्यक्तीच्या नावाची नोंदणी ओळखली जावी, निवडणूक मतदानासंबंधीची विद्यमान माहिती व आयोगाकडून वेळोवेळी प्रसारित होणाऱ्या सूचना मतदाराला मोबाइलद्वारे अवगत करणे यासाठी  मतदारांच्या  मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक केले जाणार आहे. १ ऑगस्टपासून  विशेष मोहीम सुरू झाली आहे 

या  मोहिमेत मतदान ओळखपत्रासोबत आधार क्रमांक संलग्न करण्यासाठी नमुना अर्ज क्र. ६ ब तयार करण्यात आला आहे. हा अर्ज भारत निवडणूक आयोगाच्या आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला आहे. तसेच मतदारांना ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठी ईआरओ नेट, गरुडा, एनव्हीएसपी व वोटर हेल्पलाईन मोबाईल ॲप या माध्यमांवरदेखील उपलब्ध असेल. त्याचबरोबर मतदारांकडून छापील नमुना अर्ज क्र ६ ब व्दारे आधार क्रमांक गोळा करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी घरोघरी भेटी देऊन अर्ज क्र . ६ ब भरून घेऊन त्यांचे संगणकीकरण करण्यात येणार आहे, असेही  जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.


मतदाराकडे आधार क्रमांक नसल्यास नमुना क्र. ६ ब मध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांना मनरेगा जॉब कार्ड, फोटोसहित किसान पासबुक, आरोग्य स्मार्ट कार्ड, वाहन परवाना, पॅनकार्ड, पासपोर्ट, फोटोसहित पेन्शन कागदपत्रे, केंद्र / राज्य शासन कर्मचाऱ्याचे ओळखपत्र, सामाजिक न्याय विभागाकडील ओळखपत्र यासह 11 पर्यायापैंकी कोणताही एक दस्तावेज सादर करता येईल.


मतदान ओळखपत्राशी आधार क्रमांक लिंक करण्याच्या या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घ्यावा, असेही आवाहन  जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले आहे.


*मतदार स्वतःही करू शकणार आधार कार्ड लिंक*

 National Voter Service Portal या संकेतस्थळावर Voter Helpline APP वरही ऑनलाइन पद्धतीने आधार कार्ड लिंक करून स्वप्रमाणित करता येईल. हा अर्ज भरताना मतदाराला आधार कार्डाला संलग्न असलेल्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल. याद्वारे मतदान ओळखपत्र लिंक करता येईल.


*आधार कार्डावरील क्रमांक गुप्त ठेवता येणार* आधार क्रमांक नमूद केलेले प्रत्यक्ष आणि संगणकीकृत दस्तावेज दुहेरी कुलूपबंद ठेवले जातील आणि आधार क्रमांकाची गोपनीयता अबाधित ठेवण्यासाठी आधार कार्डावरील क्रमांक लपविण्याची तरतूद केली असल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग : ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांचा ” आप” मध्ये प्रवेश | Breaking: OBC leader Haribhau Rathod’s entry into AAP

Next Post

पोलिस आणि ग्रामस्थांना चोरट्यांचे थेट ‘चॅलेंज’ ; हा चोरट्यांचा बदला म्हणायचा का? परत अकरा घरे फोडली

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

पोलिस आणि ग्रामस्थांना चोरट्यांचे थेट 'चॅलेंज' ; हा चोरट्यांचा बदला म्हणायचा का? परत अकरा घरे फोडली

ताज्या बातम्या

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972991
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group