…अखेर पठाण बाबांना त्यांची मुलगी भेटली ! ४ दिवस घराबाहेर, भान हरपलेल्या ८० वर्षीय ज्येष्ठाची ओळख व्हायरल व्हिडीओने पटली
वसंत विहार परिसरात काल रात्री ८:४५ च्या दरम्यान ऋतुजा ढावरे व त्यांची बहिण हॉटेल उत्तरायण समोर वसंत विहार परिसरातून जात असताना एक ८० वर्षाचे वयोवृद्ध आजोबा फुटपाथ वर बेवारस अवस्थेत बसलेले दिसले, पावसाने भिजलेले,ओलेचिंब कपड्यात यांची चौकशी केली असता निदर्शनास आले की ते आजोबा गेले २ दिवस तिथंच बसून आहेत.
त्याच क्षणी घटनेची दखल घेत त्या आजोबांशी बोलण्याचा प्रयत्न केला, आजोबा थोडे घाबरून गेले होते. त्यादरम्यान असे निदर्शनास आले की, त्या आजोबांना डोळ्यांना दिसतही नाही व ऐकायला सुद्धा येत नाही, परिस्थीतिचे गांभीर्य घेत रुग्णवाहिकेची वाट न पाहत संभव फाउंडेशनच्या टिमने आजोबांना रिक्षाच्या साह्याने सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले.
तिथून आजोबांच्या कुटुंबाचा शोध घेणे सुरू झाले, रात्रभर व्हायरल झालेला व्हिडीओ अखेरीस त्यांच्या मुली पर्यंत पोहोचला अन् चार दिवसांपासून हारवलेल्या वडिलांची ओळख पटली जैनौदिन पठाण रा.हनुमान नगर असे बाबांचे नाव अखेरस संभव फाउंडेशनच्या माध्यमातून वडिलांची आणि मुलीची भेट घडवून आणली गेली.
आतिश कविता लक्ष्मण
संभव फाउंडेशन, सोलापूर
९७६५०६५०९८