पत्रकार नितीन पात्रे यांना मातृशोक ; मंगल पात्रे यांचे निधन
सोलापूर – माजी महापौर बुद्धवासी मुरलीधर पात्रे यांच्या पत्नी मंगल पात्रे यांचे सोमवारी निधन झाले. मृत्यूसमयी त्या 72 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा न्यू बुधवार पेठेतील त्यांच्या राहत्या घरापासून उद्या (मंगळवारी) दुपारी एक वाजता निघणार आहे. रूपा भवानी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पत्रकार नितीन पात्रे यांच्या त्या मातोश्री होत.