सोलापूर : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्याच बैठकीत पालकमंत्र्यांनी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण च्या प्रमुख अधिकाऱ्यांना चांगलेच झापले सभागृहात डाग रोजी केल्यासारखे उत्तरे देऊ नका अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
चार महिन्याच्या प्रतीक्षेनंतर जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन सभागृहात झाली या बैठकीला सर्व आमदार प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार राम सातपुते, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार प्रणिती शिंदे, आमदार संजयमामा शिंदे, यांनी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या विविध तक्रारी पालकमंत्री समोर मांडल्या. सातपुते यांनी पालखी मार्गाचे कामे वेळेवर होत नाहीत, इतर रस्ते खराब होत आहेत अशी तक्रार केली तसेच सचिन कल्याणशेट्टी यांनीही मुख्य रस्ते दुरुस्त करण्याच्या नादात ग्रामीण आणि राज्यमार्ग खराब होत असल्याने ती कोण करणार हे निश्चित करा असा मुद्दा मांडला.
आमदार विजयकुमार देशमुख व आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहरातून जाणाऱ्या महामार्गावर दाट लोक वस्ती असलेल्या ठिकाणी यामध्ये मुळेगाव क्रॉस रोड व मल्लिकार्जुन नगर या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याची मागणी करताना अधिकाऱ्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनी टेंभुर्णी अहमदनगर रस्ता चे काम तातडीने सुरू करावे त्यासाठी टेंडर काढावे अशी मागणी केली.
पालकमंत्री विखे पाटील यांनी NHAI च्या प्रकल्प संचालकांना चांगलेच झापले रस्ते डागडूजी करता अशी उत्तरे देऊ नका या शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला.



















