महेश कोठे पंचतत्वात विलीन ; शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार ; अंत्ययात्रेस हजारांचा जनसमुदाय
सोलापूर : सोलापूरचे माजी महापौर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते महेश कोठे यांचे वयाच्या साठव्या वर्षी उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथे कुंभमेळ्यामध्ये शाही स्नान केल्यानंतर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
महेश कोठे इतक्या लवकर सोलापूरकरांना सोडून जातील असे कुणालाही वाटले नव्हते. त्यामुळे संपूर्ण सोलापूरवर शोककळा पसरल्याचे चित्र मागील दोन दिवसापासून सोलापुरात पाहायला मिळाले.
उत्तर प्रदेशाची राजधानी लखनऊ या ठिकाणाहून बुधवारी एक वाजता एअर ॲम्बुलन्सने त्यांचे पार्थिव सोलापुरात दुपारी चारच्या सुमारास आणण्यात आले.
विमानतळावर आमदार देवेंद्र कोठे, खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह महेश कोठे यांचे नातेवाईक समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तिथून त्यांचे पार्थिव जुना विडी घरकुल मधील संभाजी शिंदे विद्यालयात नेण्यात आले. त्या ठिकाणी एक तासभर त्या भागातील नागरिकांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
त्यानंतर हे पार्थिव मोरारजी पेठेतील राधाश्री निवासस्थानात आणण्यात आले. त्या ठिकाणी दीड तास थांबून त्यांची अंत्ययात्रा निघाली. सुरुवातीला जुनी मिल चाळीतील त्यांच्या जुन्या निवासस्थानी पार्थिव नेऊन नंतर सरस्वती चौक, नवी वेस पोलीस चौकी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक मार्गे जुना पूना नाका स्मशानभूमीत त्यांच्यावर अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्काराला प्रचंड असा जनसमुदाय उसळला.
काशी जगद्गुरु डॉ मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी, माजी आमदार दिलीप माने, पोलीस आयुक्त एम राजकुमार, उपायुक्त विजय कबाडे, नरेंद्र काळे, दिलीप कोल्हे, महेश गादेकर, खासदार प्रणिती शिंदे, चेतन नरोटे, सिद्धाराम म्हेत्रे, सुरेश हसापुरे, प्रकाश यलगूलवार, सुधीर खरटमल, सुभाष देशमुख, विजय देशमुख, लक्ष्मण काका जाधव, संजय हेमगड्डी, बसवराज म्हेत्रे, देवेंद्र भंडारे, बाळासाहेब शेळके, आरिफ शेख, तौफिक शेख, भूपती कमटम, मल्लिकार्जुन कमटम, अंबादास बिंगी, रामचंद्र जन्नू, सुरेश फलमारी, नरसैया इप्पाकायल, अशोक इंदापुरे, जनार्दन कारमपुरी, पद्मशाली ऑल इंडिया अध्यक्ष कंदकटला स्वामी, सत्यनारायण बोल्ली, रामकृष्ण कोंड्याल, आनंद चंदनशिवे, संजीव सदाफुले, बबलू गायकवाड, गणेश वानकर, विश्वनाथ चाकोते, अमोल शिंदे, पुरूषोत्तम बरडे, मनिष काळजे, मिलन कल्याणशेट्टी, नागेश वल्याळ, विजयकुमार हत्तुरे, राधाकृष्ण पाटील, कोमरोह सय्यद, नसीम पठाण, सुशीला आबूटे, शोभा बनशेट्टी, रोहिणी तडवलकर, डॉ किरण पाठक. दत्ता सुरवसे, जगदीश पाटील, धर्मराज काडादी, मनोहर सपाटे, किसन जाधव, बिजू प्रधाने, विक्रम देशमुख, केदार उंबरजे, अंबादास करगुळे, जय साळुंखे, माजी आमदार शिवशरण पाटील, अमर पाटील, डॉक्टर शिवरत्न शेटे, विशाल गायकवाड, काशिनाथ झाडबुके, जगदीश पाटील, अशोक निंबर्गी, राजकुमार हंचाटे, मधूकर आठवले, मेघनाथ येमुल, श्रीनिवास जोगी, व्यंकटेश कोंडी, अमर पुदाले, पेंटप्पा गड्डम, राजू राठी, मोहन डांगरे, लक्ष्मण ढोबळे, कुमार करजगी, उमेश मराठे, राजा सरवदे यांच्यासह हजारोंच्या संख्येने सर्वपक्षीय नेते, कोठे यांच्यावर प्रेम करणारे नागरिक सहभागी झाले होते.
आमदार देवेंद्र कोठे यांच्या मदतीला धावले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
माझी महापौर आणि आमदार देवेंद्र कोठे यांचे काका महेश कोठे यांचे प्रयागराज येथील कुंभमेळ्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर तेथून पार्थिव सोलापूरला आणण्यासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी वैयक्तिक लक्ष घालून महेश कोठे यांचे पार्थिव प्रयागराज वरून लखनऊ आणि लखनऊ वरून सोलापूरला आणण्यासाठी संपूर्ण यंत्रणेला आदेश दिले. त्यामुळे महेश कोठे यांचे पार्थिव सोलापूरला आणण्यासाठी मोठी मदत झाली. तसेच केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही या कामी मोठे सहकार्य केले. महेश कोठे यांचे पार्थिव सोलापुरात आणल्यानंतर सोलापूर विमानतळापासून अंत्यविधी होईपर्यंत सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे आणि संपूर्ण पोलीस यंत्रणेने सहकार्य केल्याची प्रतिक्रिया आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली.