काका हे, जिल्हा परिषदेत हे योग्य नव्हते…!
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेत फटाकेबाजी केली. यावरून जिल्हाध्यक्ष काका साठे यांच्या बाबत नाराज व्यक्त होत आहे.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सोलापूर दौऱ्यावर आल्यावर सोलापुरातील एका कार्यक्रमात हुल्लडबाजी करणाऱ्या कार्यालयीन सरचिटणीस व प्रवक्ते महेश माने यांची जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. दरम्यान माने हे काका साठे यांची मनधरणी करण्यात यशस्वी झाले. त्यानंतर पुन्हा आपणास पद मिळावे म्हणून त्यांनी काकांकडे तगादा लावला. राष्ट्रवादीच्या काकांकडे सर्व चुका माफ असतात या म्हणीप्रमाणे काकांनी त्यांना माफ केले.
शेवटी दोन-तीन वेळा शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर जिल्हा कार्यालयीन सरचिटणीस आणि प्रवक्ते पदावर निवड केली. ही निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषदेत फटाके बाजी करण्यात आली.
मुळात जिल्हा परिषदेमध्ये सध्या जिल्हा परिषदेचे सदस्यांची बॉडी नाही, प्रशासकीय राजवट सुरू आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांना बसायला दिलेले कार्यालय हे त्यांच्या ज्येष्ठतेचा सन्मान म्हणून दिले आहे. असे असताना त्यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये फटाके बाजी करणे हे मुळात काका साठे यांना तर आवडले का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.