माझं पार्सल खासदार म्हणून दिल्लीला जाईल, बीडला नाही ; मोहिते पाटलांना राम सातपुते यांचे उत्तर
सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस तालुक्याचे नेते धर्यशील मोहिते पाटील यांनी रविवारी शरद चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यावेळी आपल्या भाषणात त्यांनी आमदार राम सातपुते यांच्यावर जोरदार टीका केली “एका रात्रीत विजय दादांच्या सांगण्यावरून याला आमदार बनवलं आता, बीडला याचं पार्सल पाठवण्याचे सुद्धा धमक आमच्यात आहे”
दरम्यान सोमवारी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना माध्यमाने मोहिते पाटील यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी माझ्या आई वडिलांनी सोलापूर जिल्ह्यात रक्त सांडले आहे, अनेक वर्ष इथला ऊस तोडला आहे, त्यामुळे मी सोलापूरचाच आहे आणि माझं पार्सल हे बीडला नाही तर सोलापूरकर दिल्लीला खासदार म्हणून पाठवतील ही धमक सोलापूरकरांमध्ये असल्याचे उत्तर त्यांनी दिले.