या मुस्लिम माजी नगरसेविकेने मागितली शहर मध्य मधून उमेदवारी ; अजितदादांनी दाखवली सकारात्मकता
सोलापूर : लोकसभा निवडणुकीनंतर आता शहर मध्य या मतदारसंघातून विशेषतः मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी उमेदवारी साठी आग्रह धरला आहे. काँग्रेस पक्षाकडून अनेक जण इच्छुक आहेत. आता तर अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ही इच्छुक वाढत असून माजी नगरसेविका तस्लिम शेख यांनी शहर मध्य मधून उमेदवारीची देण्याची मागणी केली आहे.
राष्ट्रीय नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शेख यांनी भेट घेऊन आपल्या कार्याचा आढावा सादर केला आणि मध्य या सर्वाधिक मुस्लिम मतदार असलेल्या मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी केली.
अजित पवार यांनी बराच वेळ सोलापूरच्या बाबत माहिती घेतली. अजित पवारांनीच काही दिवसांपूर्वी सांगितले आहे की, अल्पसंख्याक समाजाला 10% तिकीट देणार. त्यामुळे शहर मध्य मधून उमेदवारी मिळावी म्हणून राज्यातून प्रथमच एका मुस्लिम माजी नगरसेविकेने उमेदवारीची मागणी केल्याने पक्षात आता चर्चा सुरू झाली आहे.
तस्लिम शेख या 2017 ते 2022 दरम्यान नगरसेविका राहिल्या आहेत. अनेक विकास कामे त्यांनी केली आहेत. आपल्या भागात मोठा निधी खेचून आणला आहे. त्यांचे पती इरफान शेख हे अजित पवारांचे कट्टर समर्थक समजले जातात, त्यांचे सासरे एम डी शेख हे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाल्यास निश्चितच मध्य मध्ये राष्ट्रवादीची शिट बसेल असे बोलले जात आहे.