सोलापूर : हिवाळी अधिवेशनामध्ये बुधवारी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रणिती शिंदे आणि राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यात खडाजंगी झाली.
आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात असलेले एम आर आय आणि सिटीस्कॅन मशीन का सुरू केल्या नाहीत तसेच सोलापुरात शंभर खाटांचे महिला हॉस्पिटल व शंभर खाटांचे बाल रुग्णालय बांधून तयार आहे. त्याचे उद्घाटन कधी होणार असे प्रश्न उपस्थित केले.
यावर तानाजी सावंत यांच्याकडून वेगळीच उत्तरे आली तेव्हा मात्र प्रणिती शिंदे या चांगल्याच भडकल्या पहा नेमके काय घडले सभागृहात…