प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या धोरणाच्या अनुषंगाने समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळावा, राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या योजना गोर-गरीब जनतेपर्यंत पोहचवाव्यात याकरिता आठवड्याचा दर बुधवारी भारतीय जनता पार्टी शहर कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन भाजप प्रदेश पदाधिकारी व शहर पदाधिकारी यांनी सुरू केली असल्याची माहिती भाजपा OBC मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली.
महापालिका निवडणूका लांबणीवर गेल्याने सध्या, महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडत असून नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जात असताना लोकप्रतिनिधी महापालिकेत नसल्याने अडचणी निर्माण होत असल्याचे निदर्शनास आल्याने भाजप कार्यालयात जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांचे समस्या सोडवण्यासाठी दर बुधवारी जनता दरबार घेण्यात येणार आहे,या मध्ये महापालिकेशी संबंधित विषयात माजी सभागृह नेता सुरेश पाटील नागरिकांना मदत करणार असून विविध अडचणीच्या निवारण करण्यासाठी सर्व प्रदेश पदाधिकारी जबाबदारी घेणार आहेत.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना मोदींची महत्वकांक्षी योजना असून,ही योजना पोहचण्यासाठी या योजनेचे सुकाणू समिती सदस्य , भाजपा सरचिटणीस विशाल गायकवाड दर बुधवारी भाजप कार्यालयात उपस्थित राहून मार्गदर्शन करतील.
MSEB, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास योजना करिता प्रदेश कार्यकारणी सदस्य हेमंत पिंगळे बुधवारी उपस्थित राहतील.
युवकांच्या प्रश्नांसाठी व प्रधानमंत्री मुद्रा योजना,मुख्यमंत्री व प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या मदतीसाठी भाजयुमो प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने उपस्थित राहतील.
गोर-गरिबांना महत्वाचा भेडसावणारा प्रश्न म्हणजे रेशन संबंधी व रेशनकार्ड दुरुस्ती संबंधी असतो या विषयात भाजप प्रदेश निमंत्रित सदस्य सागर अतनुरे उपस्थित असतील.
भाजप OBC मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य व सोलापूर विद्यापीठ सिनेट सदस्य यतीराज होनमाने विद्यापीठ व विद्यार्थ्यांशी संबंधित अडचणी संदर्भात उपस्थित राहून मदत करतील.
भाजप प्रदेश निमंत्रित सदस्य अमर बिराजदार व भाजप SC मोर्चा प्रदेश सचिव राजा माने नागरिकांच्या वैद्यकीय व रुग्णसेवेच्या विषयात मदत करतील.
भाजप कामगार आघाडी प्रदेश उपाध्यक्ष नागेश पासकंटी कामगारांच्या प्रश्नांसाठी कार्यालयात उपस्थित राहणार आहेत.
आज आयोजित केलेल्या जनता दरबारात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला,तात्काळ नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पदाधिकारी यांनी प्रयत्न केले असून,येणाऱ्या काळात आणखीन मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या जनता दरबारास मिळेल अशी माहिती प्रदेश पदाधिकारी यांनी दिली.