सोलापूर : लिंगायत समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य सरकारच्या वतीने महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ ची स्थापना करण्यात आली त्या अंतर्गत सोलापुरात या महामंडळाचे कार्यालय सुरू झाले आहे.
मंगळवारी लिंगायत समाजातील नेत्यांनी या कार्यालयाला भेट देऊन जगत ज्योती महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा भेट दिली. यावेळी विजयकुमार हत्तूरे, सकलेश बाभूळगावकर, नामदेव फुलारी, सचिन शिवशक्ती, नागेश पडणुरे हे उपस्थित होते.
यावेळी विजय हत्तुरे यांनी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून सुरू केल्याबद्दल राज्य सरकारचे आभार व्यक्त केले. सध्या या कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता असून ते तात्काळ भरली जावी अशी मागणी करत समाज बांधवांनी 36 जिल्ह्यांमध्ये कार्यालयात जाऊन महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा भेट द्यावी असे आवाहन केले.




















