सर्कल सुखदेव पाटील चेअरमन तर तलाठी भिमाशंकर रामण्णा भुले व्हॉईस चेअरमन

सोलापूर जिल्हा महसूल कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था नियमीत सोलापूर या संस्थेच्या सन २०२४-२५ ते २०२७/२८ या पंचवार्षीक कालावधीसाठी संचालक मंडळाची चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीसाठी २५ जून २०२४ रोजी डी.एस.भवर (प्राधिकृत अधिकारी) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यात सर्व संचालकात गुप्त मतदान पध्दतीने मतदानाद्वारे संस्थेच्या नुतन चेअरमन पदी सुखदेव अप्पाराव पाटील (मं. अधि) तहसिल कार्यालय उत्तर सोलापूर यांची १४ पैकी ०८ मते मिळवून चेअरमन पदी निवडुन आले. त्याच बरोबर व्हाईस चेअरमन पदी सर्व संचालकात गुप्त मतदान पध्दतीने नुतन व्हाईस चेअरमन पदी भिमाशंकर रामण्णा भुलें (तलाठी) तहसिल कार्यालय दक्षिण सोलापूर यांची १४ पैकी ०८ मते मिळवून निवडून आले.
सदर निवणूक प्रक्रियेत डी. एस. भवर निवडणूक निर्णय अधिकारी, अनिल मदने (सह.नि.निर्णय अधिकारी) यांचे सहकार्याने व संस्थेचे सर्व उपस्थित संचालक मंडळ काझी सादीक म. खलील, लटके संदिप भिमराव, खंडागळे शरद कमलाकर, कदम जितेंद्र रामचंद्र, बसवराज गुरुपादय्या सालीमठ, भाईजान रियाज अ.हमिद, धनुरे जगदेवप्पा रामचंद्र, भुर्ले भिमाशंकर रामण्णा, कांबळे बाबा भानुदास, राठोड पंकज अर्जुन, राजवाडे कुमाररवी अशोक, वर्षा वासुदेव बरबडे, श्रीमती, ढोणे सुनिता भागवत व त्याच बरोबर अमर पाटिल, भिगे अमरनाथ (सरचिटणीस), गायकवाड शांतीकूमार (प्रदेश उपाध्यक्ष), धैर्यशील जाधव, नवल सरवले, कांबळे रत्नाकर, गायकवाड अभय, बंदिश वाघमारे, प्रशांत भांडेकर, सुभाष मुपडे, विविध संघटनेचे पदाधिकारी व तसेच संस्थेचे कर्मचारी पाटील नागेश, मकानदार हुसेन, करमाळकर शैलजा, बिराजदार आरिफ, आबुटे मुरलीधर आदी उपस्थित होते.