लोकशासन पार्टीकडून ऍड. संतोष न्हावकर यांचा सत्कार
सोलापूर : राज्याच्या अंमली पदार्थ पथकामध्ये सरकारी वकील म्हणून सोलापूरचे प्रसिद्ध वकील संतोष न्हावकर यांची नियुक्ती झाली आहे त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातील अभिनंदन होत आहे.
दरम्यान या नियुक्ती बद्दल सोलापूर लोकशासन पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजाभाऊ दिंडोरे, जिल्हा संघटक मारुती जाधव व प्रकाश राठोड यांनी संतोष न्हावकर यांचा सत्कार तरी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.