“अजित दादाला सोडा” उमेश पाटलांच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी अंगावर ओतून घेतलं पेट्रोल ; “उमेश दादा तुतारीत चला अशी आर्त हाक”
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते पदाचा राजीनामा दिल्यानंतर उमेश पाटील यांनी आपल्या मोहोळ येथील बंगल्यात समर्थक कार्यकर्त्यांची बैठक घेतली “विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती” या उमेश पाटलांच्या पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.



मुख्य प्रवक्ते पदाचा राजीनामा दिल्यानंतर उमेश पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतच राहायचे का दुसऱ्या पक्षात जायचे यासाठी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. या बैठकीत उमेश पाटील यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी हाती घ्यावी असा एकच सूर कार्यकर्त्यांमधून निघाला.
बैठक चालू असताना वाफळे येथील सचिन चव्हाण या कार्यकर्त्याने अचानक आपल्या अंगावर पेट्रोल ओतून घेतले आणि “उमेश दादा पहिल्यांदा अजित दादांना सोडा, असे ओरडू लागला. “राजन पाटील यांनी अनेकांवर अन्याय केला आहे, त्या अन्यायातून मोहोळ मुक्त झाले पाहिजे, तुम्ही अजित पवारांना सोडून तुतारी हाती घ्या, तुम्हाला मोहोळचे जनता आमदार करेल” असे चव्हाण यांचे म्हणणे आले.
उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उमेश पाटील यांनी आपल्या सर्वांचे एकच लक्ष आहे, राजन पाटील यांच्या उमेदवाराचा पराभव करणे. त्यासाठी लगेच निर्णय घेणे योग्य नाही. मोहोळ मतदार संघ महाविकास आघाडीतून ज्या पक्षाला सुटेल त्या पक्षात आपण जाऊ, उद्या तुतारी हाती घेतली आणि राजन पाटील शरद पवार गटात गेले तर आपली अडचण होईल. त्यामुळे जरी ते शरद पवार गटात जाऊन तुतारी हाती घेऊन निवडणूक लढवले तर त्यांच्या विरोधात आपण उमेदवार निवडून आणायचा असा निर्धार उमेश पाटील यांनी केला आहे.