सुशीलकुमार शिंदेंच्या उपस्थितीत पंचशील विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
सोलापूर : मानवता विकास मंडळ संचलित पंचशील प्राथमिक माध्यमिक व ज्ञानगंगा विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हुतात्मा स्मृती मंदिरात उत्साहात संपन्न झाले.
संस्थेचे अध्यक्ष श्रीशैल रणधिरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या स्नेहसंमेलनाला काँग्रेस नेते सुरेश हसापुरे, शहराध्यक्ष चेतन नरोटे, नगरसेवक तौफिक शेख, संस्थेचे उपाध्यक्ष मसाजी गोतसुर्वे, खजिनदार भीमराव गोतसुर्वे, संचालक महेश रणधिरे, मुख्याध्यापक महानिंग यलगोंडे, मुख्याध्यापक भिमराया कापसे, मुख्याध्यापिका महामाया श्रीशैल रणधिरे, महादेव ठोंबरे, पांडुरंग चौधरी, संभाजी भडकुंबे, किरण गायकवाड, संतोष सोनवणे, ज्ञानेश्वरी संगीतराव, मुस्ताक इनामदार, साहेरा शेख, माजी महापौर अलका राठोड, कुमार चंदनशिवे, गुरुशांत मोकाशी, रोहिणी तडवळकर, तिरुपती परकीपंडला, राज सलगर, नडविनकेरी, सिध्दार्थ गायकवाड, तात्या मगर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुशीलकुमार शिंदे म्हणाले.” दलितमित्र बुद्धवासी नागनाथ रणधिरे यांनी खूप कष्टातून हि संस्था उभी केली आहे”. गोर गरीबांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय करून अनेक विध्यार्थी घडवले. त्यांचा वारसा त्यांचे पुत्र अध्यक्ष श्रीशैल रणधिरे उत्तम प्रकारे चालवत आहेत.
कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापिका महामाया रणधिरे यांनी केले. त्यानंतर तिन्ही शाखेतील विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केले. यामधून खालील क्रमांक काढण्यात आले.
बालवाडी गट
प्रथम:-पहाट गाणे
द्वितीय:- जिंगल बेल
तृतीय – बम बम बोले रिमिक्स
इ. १ली ते ४थी गट
प्रथम- दीप नृत्य उरी व ४थी
द्वितीय- पंजाबी नृत्य ४थी
तृतीय- बज ठण चली देखो श्री
उत्तेजनार्थ – मराठी रिमिक्स १ली
इ. ५ वी ते इ ७ वी गट’
प्रथम-जिस पे मरमिटे लोहे ५ वी ६ वी ७ वी
द्वितीय – आई तुझं देऊळ ५ वी
तृतीय- हृदयी वसंत फुलताना ५वी ६वी ७वी
उत्तेजनार्थ – अंगात आलयं अंगात आलयं ७वी
इ. ८ वी ते १०वी गट
प्रथम – मैं इतिहास आयना हूँ एकी
द्वितीय-कोळी वाड्याची शान १० वी
तृतीय- मी रात टाकली मी कात टाकली ८ वी ९वी
उत्तेजनार्थ देखा जो तुझे यार वी
परिक्षक म्हणून- सीमा श्रीकांत कोरवलीकर व शीतल गुरुनाथ जालीमिंचे यांनी परिक्षण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बळवंत जोशी यांनी व आभार प्रदर्शन सुर्यकांत कणमुसे यांनी केले.