सोलापूर जिल्हा परिषदेतील अफलातून अंगत पंगत…..
जिल्हा परिषद सोलापूर
जिल्हा परिषदेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले होते व त्या उपक्रमात बांधकाम विभाग क्रमांक दोनचा लक्षणीय असा सहभाग होता.
त्याअनुषंगाने बांधकाम विभाग क्रमांक २ येथील महिला सहकाऱ्यांनी सर्वांना जेवण खाऊ घालायचे असे मनोमन ठरवले होते…
यात प्रामुख्याने म्हेत्रे मॅडम व साठे मॅडम यांनी पुढाकार घेतला होता…..
सर्व कर्मचारी हे मार्च अखेरच्या ३ सुट्ट्यांना मुकले होते व काम करून त्यांना थकवा आला होता हा थकवा घालवण्यासाठी तसेच वेगवेगळ्या पाककृती व वेगवेगळे चवीचे अनुभव घेणे रमजानच्या पवित्र महिन्यात आमच्या नशिबी होते आणि हा योग योगायोगाने या महिला सहकाऱ्यांनी जुळवून आणला होता…….
थोडक्यात ही इफतार पार्टी होती. या महिन्यात जर पुण्य वाटले तर ते ७० पटीने वाढते असा मुस्लिम समाजाचा विश्वास आहे. आणि तो विश्वास या महिला सहकाऱ्यांनी सत्यात उतरवला……
जेवणात पदार्थांची रेलचेल होती त्याच प्रामुख्याने धपाटे, वांग्याची भाजी, कोशिंबीर, मसालेभात व गव्हाच्या खिरीचा तसेच मठ्ठाचा समावेश होता …..
अंगत पंगतीची मजाच काही और असते. जेवणाच्या वेगवेगळ्या पदार्थांच्या चविसोबत वेगवेगळ्या माणसांचे वेगवेगळे स्वभाव सुद्धा निदर्शनास येतात. पंक्तीत वाढणारे व पंक्तीत स्वतःचे जेवण मर्यादित ठेवून इतरांना वाढणारे, स्वतःचे जेवण पहिल्यांदा चालू करणारे, हळुवारपणे जेवणाचा आस्वाद घेत जेवण बरोबर अर्ध्या तासात पूर्ण करणारे, लोकांनी आपण तयार केलेले पदार्थ मनापासून खाल्ल्यामुळे आपोआपच आपले पोट भरलेले, बाहेर गावावरून आलेल्या पाहुण्यांना मनापासून आग्रह करणारे अशा विविध मानवी स्वभावांचे दर्शन आज या निमित्ताने घडले…..
इतरांच्या आनंदात आनंद मानणे तसेच समर्पित वृत्तीने काम करणे व आपल्यांसाठी आपल्या व्यस्त शैलीतून वेळ काढणे तसेच एकमेकांची प्रशंसा करणे हे गुण सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत ……
जेवणानंतर पानाचा आस्वाद घेणे हे एका समाधानकारक जेवणाचे प्रतीक आहे त्या अनुषंगाने सर्वांनी मसाला पानाचा स्वाद घेतला. सर्वांनी “अन्नदाता सुखी भव व आजच्यासारखे रोज मिळो” असा मनोमन निग्रह केला…
अर्थात हे काही शक्य होणार नाही व कुठलीही गोष्ट जर मर्यादित स्वरूपात व कधीतरी केली तर त्याची खुमारी काही वेगळीच असते…..
अशा या एकात्मतेचे प्रदर्शन या अंगत पंगतीच्या निमित्ताने निदर्शनास आले……..
संतोष कुलकर्णी ,
कार्यकारी अभियंता
बांधकाम विभाग क्रमांक २ सोलापूर…….