सोलापूर जिल्हा परिषदेत कर्मचारी युनियनचे काळया फिती लावून कामकाज अन् घंटानाद
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन संघटना यांनी राज्यात जि.प. अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दिर्घ कालावधीपासून प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केल्याचे पाहायला मिळाले.
जुनी पेन्शन, वेतन त्रुटी व पदोन्नतीमधील स्तर कमी करणे इत्यादीबाबत शासन पातळीवर हेतुतः दुर्लक्ष व उदासिनता करीत असल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 10 मार्च 2025 रोजी जिल्हा परिषद सोलापूर येथे जिल्हा परिषद कर्मचारी युनियन शाखा सोलापूरच्या वतीने दुपारी सोलापूर जिल्हा परिषद पुनम गेट समोर घंटानाद आंदोलन करण्यात आले व या आंदोलनातील प्रलंबित मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना देण्यात आले.
यावेळी डॉ. शत्रुघ्नसिंह माने विभागीय संघटक, तजमुल मुतवल्ली जिल्हाध्यक्ष, विलास मसलकर सचिव, निर्मला राठोड महिला सचिव, बसवराज दिंडॊरे कार्याध्यक्ष, स्वाती स्वामी महिला कार्याध्यक्ष, संतोष शिंदे मुख्य संघटक, मृणालिनी शिंदे महिला मुख्य संघटक, विशाल घोगरे, राकेश सोड्डे उपाध्यक्ष, सोनाली कदम, सविता काळे महिला उपाध्यक्ष, रोहीत घुले कोषाध्यक्ष, अंबिका वाघमोडे महिला कोषाध्यक्ष, महेश पंतगे, रहिम मुल्ला, महेश केंद्र सहकोषाध्यक्ष, नवनाथ वास्ते, रणजित घोडके, नागेश कोमारी, डॉ उमाकांट ढेकळे, अभिजीत कांबळे सहसचिव, आरती माढेकर महिला सहसचिव, दयानंद परिचारक मुख्य सल्लगार, रफ़िक शेख, प्रभाकर डॊईजोडे, विशाल उंबरे प्रसिध्दीप्रमुख, सविता मिसाळ, ज्योती लामकाने महिला प्रसिध्दीप्रमुख, अश्विनी सातपुते, फर्जाना शेख, पोगुल, श्रीशैल देशमुख, योगेश हब्बू, शिवा नागूर, पेठकर, डाळजी, प्रथमशेट्टी, रामकृष्ण पाटील, तानाजी अवताडे, शिवानंद म्हमाने श्रीधर कलशेट्टी, मनोज राठोड, अभिमन्यू कांबळे, दत्ता घोडके, श्रीमती माळी, श्रीमती भोसले, श्रीमती पोगुलवड, श्रीमती रांजणे, श्रीमती ऋतुजा शिंदे,श्रीमती गायकवाड, हरिष राऊत, संजय पाटील, एस एम पेद्दे, सचिन पवार, शहानवाज शेख, दिपक चव्हाण, विजय् लिंगराज, शरद वाघमारे, सलिम शेख, ओमप्रकाश कोकणे, गायकवाड, पांचाळ, शिवाजी राठोड, चंद्रकांत कोळी, रोहण भोसले, संदीप घोडके, प्रसाद काशीद, मल्लिनाथ स्वामी, चिन्मय घाडगे, भीमाशंकर वाले, हारून नदाफ, प्रफुल रणदिवे, श्री गणपती कांबळे, सूर्यकांत साळूंके, सौरभ डोंगरे, सचिन कारडे, श्रीकांत धोत्रे, गुरु रेवे, रविकांत कोरे, विनायक कोचपोर, प्रदिप सकट, ऋषिकेश जाधव, इरणा भरडे तसेच सर्व पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.