सोलापुरात काँग्रेसचा बाबा ठरला आपल्या भागात सरस ; ताईंना लीड देण्याची परंपरा ठेवली कायम
सोलापूर : भाजपच्या हातून आपला बालेकिल्ला हिसकावून घेण्यात यंदा सोलापुरातील काँग्रेस यशस्वी ठरला आहे आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरातील भाजपची गोडधोड रोखत दणदणीत विजय मिळवला या विजयात काँग्रेस पक्षासह शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांचा मोलाचा वाटा म्हणावा लागेल.
शहर मध्य मधील मोची समाज काँग्रेसचा पारंपारिक मतदार. या निवडणुकीत शिवसेनेच्या राज्याच्या प्रवक्त्या प्राध्यापिका ज्योती वाघमारे यांच्यामार्फत भारतीय जनता पार्टीने या मतदानाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला. राम सातपुते यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी निवडणुकीच्या दरम्यानच स्वर्गीय करण म्हेत्रे यांच्या अंत्ययात्रा वेळी पोलिसांसोबत झालेल्या झटापटीनंतर मोची समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची विनंती केली होती. त्यामुळे मोची समाजाच्या युवकांमध्ये एक वेगळे वातावरण तयार झाल्याचे दिसून आले.
पण जुन्या प्रभाग क्रमांक पंधरा मधील माजी युवक अध्यक्ष अंबादास करगुळे व माजी नगरसेविका वैष्णवी करगुळे यांनी कोनापुरे चाळ, तुराट गल्ली, बुद्ध नगर फॉरेस्ट, न्यू तिरेगाव फॉरेस्ट या भागातून सुमारे चौदाशे इतके मताधिक्य देऊन प्रणिती शिंदे यांना लीड देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. या निकालावरून आपल्या भागात बाबा करगुळे यांचं वर्चस्व अबाधित राहील्याचे दिसून येत आहे.