सोलापुरात शिक्षकांनी दिले सरकारला टेन्शन ; शिक्षकांचा विराट मोर्चा
सोलापूर : जुनी पेन्शन सुरू करणे, संच मान्यता जाचक अटी रद्द करणे, कंत्राटी शिक्षक भरती रद्द करणे अशा महत्त्वाच्या मागण्यासाठी सोलापुरात शिक्षकांनी भव्य असा मोर्चा काढून एक प्रकारे सरकारला टेन्शन दिल्याचे पाहायला मिळाले.
सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक संघटना एकत्रित येऊन हा मोर्चा काढण्यात आला. चार हुतात्मा पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा दुपारी दोनच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या उपोषण गेटवर आला. या ठिकाणी या मोर्चाचे रूपांतर भव्य अशा सभेमध्ये झाले.
या मोर्चामध्ये “एकच मिशन जुनी पेन्शन” अशी जोरदार घोषणाबाजीने सारा परिसर दुमदुमून गेला होता.
मोर्चा मधील सहभागी शिक्षकांनी पहिल्यांदाच भगवे शेले आपल्या गळ्यात घातल्याचे पाहायला मिळाले.
शिक्षक समन्वय समिती सदस्य सुरेश पवार यांनी या मोर्चा बाबत अधिक माहिती दिली.