Wednesday, March 4, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर रेल्वे स्थानकावर थरार ; पक्षांची तस्करी रोखण्यासाठी वन्यजीवप्रेमी व शिकऱ्यात धरपकड

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
29 May 2025
in Enviornment
0
सोलापूर रेल्वे स्थानकावर थरार ; पक्षांची तस्करी रोखण्यासाठी वन्यजीवप्रेमी व शिकऱ्यात धरपकड
0
SHARES
447
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर रेल्वे स्थानकावर थरार ; पक्षांची तस्करी रोखण्यासाठी वन्यजीवप्रेमी व शिकऱ्यात धरपकड

दुपारी मुंबईहून विशाखापट्टणम ला जाणारी गाडी सोलापूर रेल्वे स्थानकावर उभी होती. नाग फाउंडेशनचे सिद्धेश्वर मिसालेलू हे काही कामानिमित्त सोलापूर रेल्वे स्थानकावर गेले असता त्यांना काही इसम संशयितरित्या फिरत असताना त्यांनी पाहिले. त्यांच्या जवळ पिंजरे होते व एका पिंजऱ्यात काही राखी तित्तर पक्षी होते. या पक्षांना पाळण्यास, वाहतूक करण्यास सक्त मनाई आहे. हे पाहून सिद्धेश्वर यांनी त्या शिकऱ्यांजवळ विचारणा करताच आम्ही पक्षी पाळणारे लोकं आहोत असे उत्तर दिले. ते 8 ते 10 जण होते. त्यात महिलाही होत्या.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/05/VID-20250529-WA0079.mp4

सिद्धेश्वर यांनी ही घटना सोलापूरचे वन्यजीव अभ्यासक राहुल शिंदे यांना कळविली. हे ऐकताच शिंदे यांनी संभावित धोका ओळखून सिद्धेश्वर यांच्या मदतीला नाग फाउंडेशनच्या विनोद गायकवाड व मंगेश शिंदे यांना पाठविले व त्वरित मदतीसाठी पोलिसांना कळविण्यास सांगितले. सिद्धेश्वर यांनी बाकीचे सदस्य पोहोचेपर्यंत त्या शिकऱ्यांकडून पक्षी असलेला पिंजरा हस्तगत केला. हे बघताच त्या शिकऱ्यांन गयावया करण्यास सुरुवात केली. शिवाय पैसेही देण्याचा प्रयत्न केला. परंतु सिद्धेश्वर यांनी त्यांचे काहीएक न ऐकता आरपीएफ पोलिसांना कळविले. हे पाहून अजून दोघे-तिघे रेल्वेतून बाहेर येऊन सिद्धेश्वर यांना धक्काबुक्की करत ढकलून पळून गेले.

तितक्यात तेथे आलेले पोलीस व नाग फाउंडेशनच्या अन्य सदस्यांनी त्यांचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु शिकारी तोपर्यंत फलाट क्रमांक 1 वरून 3 वर गेले होते. त्यांच्याकडे 3 ते 4 प्रकारचे पिंजरे व जाळ्या होत्या. त्या सर्वांनी विजापूरकडे जाणाऱ्या गाडीत धाव घेतली. शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यापर्यंत पोहोचण्या आधीच गाडी हलली. ही घटना वनविभागाला कळविण्यात आली. वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल होईपर्यंत काहीकाळ पक्षी व पिंजऱ्याला पोलिसांकडे ठेवण्यात आले. नंतर या पक्षांना विभागाच्या ताब्यात देऊन त्यांची मुक्तता करण्यात आली. या थरारक घटनेमुळे आपल्या जीवाची पर्वा न करता त्या पक्षांची सुटका करणाऱ्या या धाडसी नाग फाउंडेशनच्या वन्यजीव प्रेमींचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तित्तरसारख्या पक्षांची शिकार वाढली असून शिकारीचे लोण आता एका गावाहून दुसऱ्या गावात रेल्वेद्वारे सहजरीत्या पोहचत आहे. तित्तर हा पक्षी वन्यजीव अधिनियम 1972 (सुधारणा 2022) अंतर्गत अनुसूचि 2 मध्ये असल्याने त्याची शिकार करणे, तस्करी करणे, जवळ बाळगणे यास बंदी असून असे करणाऱ्यास दंडाची व शिक्षेची तरतूद आहे. शिवाय एखादा विषारी साप अथवा प्राणी अवैध वाहतुकीदरम्यान सुटल्यास मोठा अनर्थ घडू शकतो. अशी अवैध वाहतूक रोखण्याकरिता रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे.
वन्यजीव अभ्यासक राहुल शिंदे, नाग फाउंडेशन.

गेल्या काही महिन्यांपूर्वी सोलापूर रेल्वे स्थानकावर सापाची अवैध रित्या होणारी वाहतूक थांबवून आमच्या टीमच्या सदस्यांनी डूरक्या घोणस साप हस्तगत केला होता. तेव्हा रेल्वे स्थानकावर कन्व्हेयर बेल्ट स्कॅनर मशीनची मागणी आमच्या संस्थेकडून करण्यात आली. परंतु त्याची दखल न घेतल्याने सापाची, पक्षांचे व इतर वन्यजीवांची रेल्वेतून अवैध वाहतूक नित्याचीच झाली आहे. रेल्वे प्रशासनाने यावर गांभीर्याने विचार करून तात्काळ कारवाई केली पाहिजे.

विनोद गायकवाड, उपाध्यक्ष, नाग फाउंडेशन

Tags: #Solapur railway stationNag faundation
SendShareTweetSend
Previous Post

आषाढी साठी सोलापूर झेडपी प्रशासन लागले कामाला ; कामात हलगर्जी कराल तर…

Next Post

देवेंद्र कोठेंच्या ‘ब्रेकफास्ट’ने सुरू झालेला दौरा बापूंच्या चहाने संपला ! बावनकुळे यांना सांभाळावी लागली सर्वांचेच मने

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
देवेंद्र कोठेंच्या ‘ब्रेकफास्ट’ने सुरू झालेला दौरा बापूंच्या चहाने संपला ! बावनकुळे यांना सांभाळावी लागली सर्वांचेच मने

देवेंद्र कोठेंच्या 'ब्रेकफास्ट'ने सुरू झालेला दौरा बापूंच्या चहाने संपला ! बावनकुळे यांना सांभाळावी लागली सर्वांचेच मने

ताज्या बातम्या

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026
दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

19 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1970965
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group