मुख्यमंत्री “नको तुमची लाडकी बहीण योजना, आम्हाला हवी सुरक्षा” ; राष्ट्रवादी महिला आघाडीचे आंदोलन
सोलापूर : बदलापूर येथील दोन चिमूरड्या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर सोलापुरात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
दरम्यान शहराध्यक्ष सुनिता रोटे यांनी घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली त्याचा आम्हाला अभिमान वाटतो परंतु आमच्या मुलींना तुम्ही सुरक्षा कधी देणार? असा प्रश्न विचारत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली.
यावेळी लता फुटाणे, वंदना भिसे, सुरेखा मोगरे, नसीम शेतसंधी, सुनिता गायकवाड, गौरा कोरे, मनीषा माने, रेखा सपाटे, प्रतीक्षा चव्हाण, सारिका नारायणकर, प्रेमलता कांबळे, कुंदन कांबळे, गुलशन जमादार यांच्यासह महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.