दिलीप माने यांच्या निवासस्थानी आज राज्याचे सहकार मंत्री दुपारच्या भोजनाला
सोलापूर : महाराष्ट्र राज्याचे नूतन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्यांचे सोलापूर शहरात भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे सोलापुरात रविवारी सकाळी साडेआठ वाजता आगमन होईल. साडेदहा वाजता हेरिटेज लोन येथे श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सव सांगता समारंभ ते उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी दीड वाजता होटगी रोडवरील माजी आमदार दिलीप माने यांच्या सुमित्रा या निवासस्थानी सदिच्छा भेट आणि दुपारी त्या ठिकाणी ते भोजन घेणार आहेत.
दुपारी अडीच ते साडेतीन या दरम्यान शासकीय विश्रामगृहावर त्यांचा वेळ राखीव असून नागरिकांच्या भेटी घेणार आहेत. साडेतीन वाजता अंत्रोळीकर नगर येथील ब्रह्मदेव दादा माने बँकेच्या नूतन शाखेचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होईल.
त्यानंतर सात रस्ता परिसरातील राजेंद्र हजारे यांच्या जनकल्याण मंत्री स्टेट सोसायटीला ते भेट देणार आहेत. आयपीएस जफरताज पाटील यांच्या सिव्हील चौक परिसरातील निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट राहणार आहे. परत रात्री साडेसात ते दहा दरम्यान शासकीय विश्रामगृहावर त्यांचा वेळ राखीव आहे.