सोलापुरात होणाऱ्या चर्मकार वधु वर पालक परिचय मेळाव्याला तीन राज्यातून सहाशे जण येणार
सोलापूर : चर्मकार समाज विकास मंडळाच्या वतीने एक जून 2025 रोजी सोलापूर येथे राज्यस्तरीय वधु वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्यास महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून 1 हजार समाज बांधवांची उपस्थिती राहणार आहे. या वधू-वर मेळाव्यात 600 वधूवरांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक राजशेखर जेऊरकर यांनी दिली.


चर्मकार समाज विकास मंडळ सोलापूरच्या वतीने चर्मकार समाजातील उपवर वधू वर, घटस्फोटीत, विधवा, विधूर,. व दिव्यांग यांचा वधू वरासह पालक परिचय मेळावा 1 जून 2025 रोजी जुळे सोलापुरातील जगदीशश्री मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. .
या मेळाव्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातून समाजबांधवांनी नोंदणी केली आहे.
इतर राज्यातून शंभर आणि महाराष्ट्रातून 500 वधूवरांनी नोंदणी केली आहे. महाराष्ट्रातून मुंबई,पुणे,सातारा,नगर, नाशिक, लातूर,धाराशिव,अकोला, बीड यासह इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली आहे.
कर्नाटकातील इंडी, विजापूर, बेळगाव, बागलकोट येथून नोंदणी झाली आहे. या मेळाव्याची संपूर्ण तयारी झाली आहे, अशी माहिती प्रमुख आयोजक राजशेखर जेऊरकर , हरिदास टोणपे, वामन धुळगाव यांनी दिली.
या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून
उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पाटबंधारे विभागाचे निवृत्त कार्यकारी संचालक हरिदास टोणपे राहणार आहेत.
याचबरोबर समाजातील प्रतिष्ठित मान्यवरांची याप्रसंगी उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्यास समाज बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन चर्मकार समाज विकास मंडळाच्या वतीने करण्यात आले.
या पत्रकार परिषदेस दत्तात्रय शिंदे, श्रीकांत मब्रुखाने, परशुराम शिंदे, शिवपुत्र हवाळकर, अंबादास हरवलकर, अंबादास चाबुकस्वार, सुधीर बनसोडे, सदाशिव कांबळे, संगीता शिंदे, राजश्री खडतरे, सुनीता वनसकर, पौर्णिमा धुळराव यांची उपस्थिती होती.