ब्रेकिंग ! सोलापुरात मंत्री नितेश राणे यांचे डिजिटल पालिकेने काढले
सोलापूर : राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आहेत. सायंकाळी पाच वाजता ते विमानाने सिंधुदुर्ग येतो सोलापूर विमानतळावर येणार आहेत त्यानंतर भवानी पेठ मध्ये वस्ती या ठिकाणी 51 फुटी हनुमान मूर्तीच्या महाआरतीस उपस्थिती लावणार आहेत. यानंतर अक्कलकोट मैंदर्गी या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीने त्यांच्या सत्कार समारंभ होणार आहे.

दरम्यान सोलापूर शहरातील सात रस्ता या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अमोल गायकवाड व शिवराज गायकवाड यांनी मंत्री नितेश राणे यांच्या स्वागताचे डिजिटल लावले होते. सात रस्ता हा चौक नो डिजिटल झोन असल्याने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मंत्री नितेश राणे यांचे डिजिटल फलक तातडीने काढले.