“मी आमदार खासदार घरी, इथे तुमची नोकर” ; आमदार प्रणिती शिंदेंच्या निंबर्गी गावात सभेला तुफान गर्दी
सोलापूर : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान आज भारतीय जनता पार्टी मुळे धोक्यात आले आहे. हे संविधान वाचवायचे असेल तर काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाही त्यामुळे आपल्या भागातून भाजप विरोधात मतदान झालं पाहिजे असे आवाहन करतानाच काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मी आमदार, खासदार माझ्या घरी असेन परंतु या ठिकाणी तुमची नोकर म्हणून काम करेन असा शब्द त्यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील ग्रामस्थांना दिला.
आमदार प्रणिती शिंदे यांचा शुक्रवारी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती दौरा झाला. सकाळी बसवनगर या ठिकाणाहून या दौऱ्याची सुरुवात झाली, दौऱ्याचा शेवट मंद्रूप येथील सभेने झाला. या दौऱ्यात काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापुरे, बाजार समितीचे संचालक अमर पाटील, बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके, पृथ्वीराज माने यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित होते.
निम्बर्गी या गावांमध्ये प्रणिती शिंदे यांच्या सभेला विराट गर्दी होती या ठिकाणी माजी आमदार दिलीप माने, काँग्रेस नेते सुरेश हसापुरे, शिवसेना नेते अमर पाटील, सरपंच श्रीदीप हसापुरे युवा नेते गंगाधर बिराजदार यांच्यासह ग्रामस्थ हजारोच्या संख्येने उपस्थित होते.