हगलुर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी
सौ.प्रगती अमित भडकुंबे यांची निवड
झाल्याबद्दल माजी आमदार दिलीपराव माने
यांनी सत्कार करुन आशीर्वाद दिले.
यावेळी माजी सभापती रजनी भडकुंबे, माजी
उपसभापती संभाजी भडकुंबे,तात्या मगर,
अमित भडकुंबे,तात्त्या मगर, संगीता बेळ्ळे,
रफिक पठाण,सुभाष शिंदे, पाटलोजी जानराव,
जैनुद्दिन शेख,आदि उपस्थित होते.
भडकुंबे कुंटुंब भाग्यवान आहे त्यांच्या घरात
पदे जातात.त्यांनी निष्ठा व जनतेचा विश्वास जपला. तर गावाच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील असल्याचे माने यांनी सांगुन सौ.प्रगतीमुळे हगलूर गावाची अधिक प्रगती होईल असे कौतुकाने सांगीतले.
संभाजी भडकुंबे हे पंचायत समितीचे उपसभापती, त्यांची पत्नी सौ.मिनाक्षी भडकुंबे,सरपंच व जिल्हा परिषद सदस्य,कन्या रजनी भडकुंबे पंचायत समितीचे सभापती, मुलगा अभिजित भडकुंबे, व भाच्चे विकास बनसोडे, उपसरपंच तर आता सुस्ना सौ.प्रगती भडकुंबे या उपसरपंच झाल्या.एका कुंटुबात स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.