ग्रेट भेट ! छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी ‘सिंहासन’च्या कार्यालयात ; दिलीप स्वामी यांनी जपले ऋणानुबंध
सोलापुरात डिजिटल मीडियातील लोकप्रिय सिंहासन चैनल च्या कार्यालयाला छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी रविवारी सदिच्छा भेट दिली. यावेळी कटारे कुटुंबीयांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्यासोबत मुंबई म्हाडाचे वित्त नियंत्रक अजयसिंह पवार, उद्योजक तथा राष्ट्रवादीचे नेते प्रल्हाद काशीद, जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाचे सचिन जाधव, पत्रकार इमरान सगरी यांची उपस्थिती होती.


जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी सिंहासन चैनल च्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी सोलापूर ऑनलाईन सर्व्हिसेस आणि सिंहासनच्या कार्यालयाची पाहणी करत कौतुक केले.


जिल्हाधिकारी स्वामी यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तब्बल पावणेतीन वर्ष काम केले. या ठिकाणी त्यांनी आपल्या कामाची वेगळी छाप सोडली. सोलापुरात राबवलेले अनेक उपक्रम महाराष्ट्र राज्याने घेतले. त्यानंतर त्यांचे छत्रपती संभाजी नगर येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली.




















