माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंची सिंहासन कार्यालयाला भेट ; साहेबांनी ‘प्रणिती’सोबत काढला विशेष फोटो
सोलापूर : देशाचे माजी गृहमंत्री, राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी रविवारी सिंहासन न्यूज चॅनलच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी कटारे परिवाराच्या वतीने त्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. संपादक प्रशांत कटारे यांनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी कार्यालयाची पाहणी करीत त्यांनी संपूर्ण वाटचालीची माहिती घेतली. सिंहासनच्या निर्भीड आणि विश्वासार्ह बातम्यांचे विशेष कौतुक केले.
यावेळी संपूर्ण कुटुंबीयांसोबत त्यांनी फोटो काढले. यावेळी प्रणिती कटारे आणि मनीष कटारे यांच्या सोबत साहेबांनी त्यांना जवळ घेत फोटो काढला. यावेळी त्यांनी बराच वेळ कौटुंबिक गप्पा मारल्या. बऱ्याच जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.
यावेळी शहराचे अध्यक्ष चेतन नरोटे, माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे, नूतन प्रदेश सरचिटणीस श्रीशैल रणधिरे, महिला शहराध्यक्ष प्रमिला तूपलवंडे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार हत्तुरे, प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी, नूतन शहर सरचिटणीस संतोष सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते आमचे मित्र गुरुशांत मोकाशी , हगलूरचे युवा नेते किरण गायकवाड, पांडुरंग सुरते, अमोल गायकवाड, शशिकांत कटारे, अमृत झळके, युवा नेते सिद्धार्थ रणधिरे, योगेश रणधिरे, पद्मिनी कटारे, मनिषा कटारे, सुनीता गायकवाड, अनिता गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.





















