दक्षिणचे इच्छूक राजेश काळे यांचा यु टर्न ; आता सोमनाथ वैद्य यांना दिला पाठिंबा
सोलापूर महापालिकेच्या भाजपचे माजी उपमहापौर राजेश काळे यांनी सोमनाथ वैदय यांना भाजपकडून दक्षिण सोलापूर विधानसभा उमेदवारी मिळण्यासाठी पाठीबा दिला आहे. गेल्या 2 दिवसापूर्वी भाजपच्या माजी सभागृह नेत्यासह 6 माजी नगरसेवकांनी सोमनाथ वैदय यांना पांठिबा दिला होता. राजेश काळे हे सुध्दा दक्षिण मधून इच्छुक असल्याचे समोर आले होते आता मात्र त्यांनी यू टर्न घेतला आहे.