सोलापूर जिल्ह्याचे तापमान 2 अंश सेल्सिअस कमी करण्यासाठी प्रयत्न ; परिवर्तन समूह संस्थेचा असा ही पुढाकार
परिवर्तन समूह बहुउद्देशीय या संस्थेने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठस 2000 महोंगणीची रोपे प्रदान केली. या करिता HDFC BANK चे CSR मुळे मदत मिळाली. देशाच्या 78 व्या स्वातंत्र्य दिना दिवशी अत्यंत आनंदात आणि उत्साहात हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम विद्यापीठाच्या आवारात साजरा झाला.
महोगणी हे सर्व प्रकारच्या जमिनी तसेच उष्ण वातावरणात ही चांगल्या प्रकारे वाढणारी वृक्ष प्रजाती आहे. महोगणी वृक्षाची पाने, फुले, लाकुड, फळ हे lबहु उपयोगी आहेत. याचा उपयोग कॅन्सर, मलेरिया, एनिमिया व इतर आजारावरील औषधी बनवण्याकरिता होतो. वृक्षाचे वयोमान १०० वर्षा पेक्षा अधिक आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु प्रकाश महानवर यांच्या हस्ते वृक्षारोपणचे उद्घाटन करण्यात आले. परिवर्तन समूह बहुउद्देशीय संस्थेच्या सचिवा अमृता अकलूजकर, यांनी HDFC बँक कडून CSR मंजूर करून आणला.
सोलापूर विद्यापीठातील प्र.कुलगुरू प्रा.लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगीनी घारे, डॉ राजेंद्र वडजे, संचालक NSS. प्रा व्ही.बी. घुटे, प्र.वित्त व लेखा अधिकारी, डॉ.श्रीकांत अंधारे, संचालक परीक्षा विभाग प्रशांत चोरमले, आयटी समन्वयक गिरीश कुलकर्णी, अभियंता अमोल काळवणे, DSW तसेच विद्यापीठातील संकुलाचे विभाग प्रमुख व प्राध्यापक व विद्यापीठातील अधिकारी वर्ग व कर्मचारी उपस्थित होते. परिवर्तन समूह बहु उद्देशीय संस्थेकडून खजिनदार जगदीश बिडकर, राजरत्न लांबतुरे, मनिष काटे, व संस्थेचे स्वयंसेवक उपस्थित होते.