पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त पृथ्वीराज नरोटे युवा मंचचे २५ मूर्तीचे वाटप
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २९९ व्या जयंती निमित्त युवा नेते पृथ्वीराज चेतन नरोटे युवा मंचच्या वतीने सोलापूर शहर व जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव मंडळाकरिता २५ मूर्तीचे वाटप आमदार प्रणिती शिंदे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू प्रकाश महानवर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल, शिवसेना जिल्हा अध्यक्ष गणेश वानकर, माजी नगरसेवक सुरेश पाटील, विनोद भोसले, अशोक निंबर्गी, मनोज यलगुलवार, बाळासाहेब शेळके, संयोजक चेतन नरोटे, पृथ्वीराज नरोटे, मध्यवर्तीचे अध्यक्ष अमर हळली, सागर पिसे, जयवंत सलगर, माणिक नरोटे, अक्षय वाकसे, अशोक देवकते, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत डॉ निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे करण्यात आले. यावेळी मूर्ती घेण्यासाठी आलेल्या मंडळांनी आणलेल्या धनगरी गजी ढोल, ताश्या, हलग्याच्या आवाजाने, जय मल्हार च्या घोषणांनी परिसर धूमधुमुन गेला होता.
यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त चेतनभाऊ, पृथ्वीराज यांनी मूर्ती वाटप कार्यक्रम घेतला तो अतिशय चांगला उपक्रम आहे, अहिल्यादेवी होळकर यांचे विचार घराघरात पोचले पाहिजे. अहिल्यादेवी होळकर, जिजाऊ माँ साहेब, रमाबाई आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांचे स्मरण केल्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होत नाही. रणरागिणी अहिल्यादेवी होळकर यांनी चौकटीबाहेर जाऊन समाजातील सगळ्यासांठी काम केले. पुरुषप्रधान समाजामध्ये अश्या महिलांनी आपल्या कार्यामुळे, लढल्यामुळे त्यांना आज मोठ्ठे स्थान प्राप्त झाले आहे. आम्ही त्यांचा संघर्षाची कहाणी ऐकल्यामुळे त्यांचा आदर्श घेतल्यामुळे आज तुमच्यासमोर उभा आहे. आपण जयंती साजरा करताना विसरू नये की आपल्याही घरात एक अहिल्या आहे तिला प्रोत्साहन द्या, सन्मान द्या, आपण सगळ्यांनी नेहमी मला, काँग्रेस पक्षाला साथ दिली, परवाच्या निवडणुकीत ही सर्वांनी साथ दिली त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करते.
या कार्यक्रमास महादेव येरणाळ, रुपेश गायकवाड, संगप्पा म्याकल, महेश गाडेकर, विलास पाटील, आबा मेटकरी, मनीषा माने, गणपत कटरे, तिरुपती परकीपंडला, भीमाशंकर टेकाळे, अंबादास गुत्तिकोंडा, हणमंतू सायबोळू, जितू वाडेकर, दत्ता शिरगिरे, आनंद जमदाडे, गणेश माने, राजू पुठ्ठा, भारत सलगर, दिनेश भिसे, राजू येरणाल, पांडुरंग पुठ्ठा, आप्पा सलगर, विलास खांडेकर, अतीन चौरे, विजू थोरात, संजय कदम, सन्नी पैलवान देवकते, आदर्श पुठ्ठा, अक्षय टेळे, आदित्य पुठ्ठा, शृंगार मेटकरी, इंद्रजित नरोटे, नागेश म्हेत्रे, सागर उबाळे, परशुराम सतारेवाले, लखन गायकवाड, संकेत माने, गणेश वड्डेपल्ली, सुभाष वाघमारे, संजय गायकवाड, सुशीलकुमार म्हेत्रे, महेश वड्डेपल्ली, शिवशंकर अंजनालकर, बापू वाघमोडे, मनिष मेटकरी, नूर अहमद नालवर, शोभा बोबे, सुमन जाधव, शिल्पा चांदणे, प्रियांका गुंडला, अभिषेक अच्युगटला यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬