सोलापुरात भाजपकडून दिलीप शिंदेंना पसंती ; स्थानिक, ओरिजनल आणि पत्रकार या जमेच्या बाजू
सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवाराची पहिली यादी लवकरच जाहीर होणार आहे. सोलापूर राखीव जागेसाठी भाजप कडून उमेदवारी मिळावी म्हणून बरेच जण प्रयत्न करीत आहेत. सोलापूरकरांना मात्र यावेळी स्थानिक, अनुसूचित जातीचा ओरिजनल उमेदवार हवा आहे.
भाजपचे जुने कार्यकर्ते, सध्या माध्यम क्षेत्रात कार्यरत असणारे संपादक दिलीप शिंदे यांना सोलापुरातून पसंती दिली जात आहे.
दिलीप शिंदे यांनी सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी मिळावी यासाठी दिल्ली दरबारी आपले प्रयत्न केले आहेत. सोलापूरच्या स्थानिक नेत्यांपासून ते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांच्या भेटी त्यांनी घेतल्या आहेत, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना ही भेटून सोलापूरवर आपला दावा केला आहे.
भाजपकडे उमेदवार नसल्याने बरीच नावे समोर येत आहेत, त्यामध्ये स्थानिक ऐवजी बाहेरच्यांचीच संख्या जास्त आहे, काही नेते तर इतर समाजाचे असून केवळ अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र असल्याच्या जोरावर लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे दिसून येते.
दिलीप शिंदे यांना बौद्ध आंबेडकरी व सर्वच समाजातून प्रचंड पाठिंबा आहे . त्याचा भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्राच्या इतर ठिकाणी लोकसभेच्या जागा लढवताना मोठा उपयोग होणार आहे तसेच दिलीप शिंदे यांना समाजात प्रतिष्ठीत मानले जातात. ते सोलापूरपासून मंत्रालय स्तरावरचे पत्रकार असल्याने सोलापूरच्या प्रश्नांची त्यांना चांगलीच जाण आहे. शिंदे हे स्थानिक असल्याने आणि पत्रकाराला उमेदवारी दिल्यास माध्यम क्षेत्रात भाजप साठी चांगला संदेश जाईल. पक्षाला मागील कटू अनुभव पाहता यावेळी आंबेडकरी समाजाचे स्थानिक नेतृत्व करणारे जुने जाणते दिलीप शिंदे यांना सोलापूर लोकसभेची उमेदवारी द्यावी. प्रबळ दावेदार ठरतील अशी त्यांची कामगिरी झाली असल्याची भावना भाजपा कार्यकर्त्यातून व्यक्त होत आहे.