राजकारणात उत्तर देण्याची योग्य वेळ साधावी लागते तेव्हाच लोक ऐकतात ; देवेंद्र फडणवीस यांचा निशाणा कुणावर
सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एका कार्यक्रमात मुलाखत झाली त्या मुलाखती दरम्यान त्यांनी अनेक प्रश्नांवर आपले मत मांडले. आजपर्यंत केलेले राजकारण, राजकारणात राखलेला संयम यावर त्यांनी भाष्य करताना विरोधक कितीही शिव्या देऊ द्यात परंतु उत्तर द्यायची योग्य वेळ साधावी लागते तेव्हाच आपले लोक ऐकतात.
मला कोरी राजनीती करता येत नाही , हा माझा स्वभाव नाही आणि हे मी कधी करणारही नाही मी जेव्हा काही करतो तेव्हा विकासाच्या प्रशासनाच्या मुद्दांवर काम करायला आणि त्यावरच राजकारण करायलाच आवडत असही ते म्हणाले.