काँग्रेस कार्यकर्ते म्हणतात तर राम आमचे पण ; काँग्रेसच्या रॅलीत अवतरले श्रीराम, सीता व हनुमान
सोलापूर : काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या रॅलीत श्रीराम सीता आणि हनुमान अवतरले.
काँग्रेस पक्षाचे भटक्या विमुक्त जाती जमाती विभागाचे प्रदेश सचिव युवराज जाधव यांच्या वतीने राम सीता हनुमानाच्या वेशभूषेत कलाकार दाखल झाले होते. हे सर्वांचे सध्या लक्ष वेधून घेत आहेत.
युवराज जाधव म्हणाले श्रीराम हे भाजपचे नाही तर सर्व भारताच्या नागरिकांचे दैवत आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या तोंडी शेवटचे शब्द हे राम आले होते भाजपने रामाच्या नावाखाली राजकारण करू नये, या निवडणुकीत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे याच विजयी होतील भाजपचे रामाच्या नावाखाली राजकारण चालणार नाही अशी टीका केली.