ब्रेकिंग : सोलापुरात काँग्रेसची ताकद वाढली ;आडम मास्तर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या सोबत ; आडम यांनी कोणत्या अटीवर दिला पाठिंबा
सोलापूर : सोलापूर लोकसभा इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आडम मास्तर यांनी पाठिंबा जाहीर केला आहे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली. आडम मास्तर यांचा पाठिंबा प्रणिती शिंदे यांना जाहीर झाल्याने आता शहरातील कष्टकरी, विडी कामगार, यंत्रमाग कामगारांची बरीच मते काँग्रेस सोबत येण्याची शक्यता आहे.
काँग्रेस इंडिया आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे या सोमवारी सकाळच्या सुमारास दत्तनगर येथील अडमास्तर यांच्या कार्यालयात आल्या त्या ठिकाणी त्यांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना आडम मास्तर यांनी गेल्या १० वर्षात याला योग्य गती नाही, विकासाची योग्य दृष्टी नाही, राजकीय ईच्छाशक्तीचा अभाव आहे. म्हणून देशात राष्ट्रीय पातळीवर इंडिया आणि महाराष्ट्र राज्यात माहाविकास आघडी ही जनतेच्या सर्व समस्या, राज्याचा परिपूर्ण विकासाचे ध्येय घेऊन लोकसभेच्या निवडणुकीत उतरले असून महाविकास आघाडी पुरस्कृत, अधिकृत उमेदवार सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदासंघातील आमदार प्रणिती शिंदे यांना महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटक पक्ष म्हणून माकप च्या वतीने जाहीर पाठिंबा जाहीर करत असून मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार केला.
यानंतर यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आणि यांनी पत्रकारांना माहिती देताना शहर मध्यची जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला मिळावी यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले या प्रमुख नेत्यांची चर्चा केली आहे. त्यानुसार शरद पवार यांनी सिताराम येचुरी यांच्याशी बोलून नंतर येचूरी यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून निर्णय घ्यावा असे ठरले आहे. याबाबत सुशीलकुमार शिंदे यांच्याशी चर्चा झाली असून जर पक्षश्रेष्ठींकडून असा निर्णय झाला तर मला कोणतीही हरकत नाही असा शब्द आल्याने आपण काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिल्याचे आडम मास्तर यांनी सांगितले.