काँग्रेसचे देवेंद्र भंडारे म्हणतात मी 40 वर्ष निष्ठावंत, संजय हेमगड्डी म्हणतात माझाच क्लेम; मोची समाज उत्सूक
सोलापूर : सोलापूर मध्ये काँग्रेसची वोट बँक म्हणून ओळख असलेल्या मोची समाजातील माजी महापौर संजय हेमगड्डी आणि माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे यांनी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी मागितली आहे.
बुधवारी सकाळच्या सुमारास काँग्रेस भवन मध्ये अध्यक्ष नरोटे यांच्याकडे या दोन्ही नेत्यांनी आपले उमेदवारी मागणीचे अर्ज दाखल केले.
यावेळी माजी नगरसेवक नरसिंग कोळी, मनोज यलगुलवार, रवी यलगुलवार, दिनेश म्हेत्रे, आशा म्हेत्रे, हनुमंत सायबोळू, करेप्पा जंगम, प्रा. नरसिंह आसादे, आरिफ शेख, जेम्स जंगम, देविदास गायकवाड, नागनाथ कासलोलकर, बसवराज म्हेत्रे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान उमेदवार मागणी अर्ज पक्षाकडे दिल्यानंतर देवेंद्र भंडारे यांनी मी चाळीस वर्षे काँग्रेसचा निष्ठावंत आहे, मला उमेदवारी द्यावी तर दुसरीकडे यांनी यापूर्वी मी तीन वेळा उमेदवारी मागितली होती परंतु पक्षाचा शब्द मी मानला त्यामुळे यंदा माझा क्लेम असल्याचे त्यांनी सांगितले.