Friday, November 21, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अभिनंदन आशीर्वाद सर ! जिल्हाधिकारी यांचे उत्कृष्ट नियोजन ; 2019 च्या तुलनेत 2024 वाढला मतदारांचा एवढा टक्का

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
27 November 2024
in Administration
0
अभिनंदन आशीर्वाद सर ! जिल्हाधिकारी यांचे उत्कृष्ट नियोजन ; 2019 च्या तुलनेत 2024 वाढला मतदारांचा एवढा टक्का
0
SHARES
252
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अभिनंदन आशीर्वाद सर ! जिल्हाधिकारी यांचे उत्कृष्ट नियोजन ; 2019 च्या तुलनेत 2024 वाढला मतदारांचा एवढा टक्का

 

“भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र विधानसभा सार्वजनिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर झाला. त्यानुसार संपूर्ण राज्यासह सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान झाले तर दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. दिनांक 15 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबर 2024 या कालावधीत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया जिल्ह्यात अत्यंत निर्भीड व शांततामय वातावरणात पार पडली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या कुशल नेतृत्वाखाली सर्व 11 विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हास्तरीय नोडल अधिकारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ही प्रक्रिया यशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावली, ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात जवळपास 18 हजार अधिकारी कर्मचारी यांनी आपले योगदान देऊन लोकशाहीचा हा उत्सव थाटात पार पाडला.”

निवडणूक आयोगाने अधिसूचना जाहीर केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने 24 तास, 48 तास व 72 तासात जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील सर्व राजकीय होर्डिंग पोस्टर बॅनर्स हाटवले. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी आदर्श आचारसंहिता कक्ष प्रमुख म्हणून संपूर्ण जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम केले.

 

जिल्हास्तरीय सर्व नोडल अधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांच्या अधिनस्त सर्व अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण अत्यंत चांगले देण्यात आले, यासाठी उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी विशेष प्रयत्न केले.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व निवडणूक यंत्रणा अत्यंत दक्ष राहून कामकाज करत होते. मतदार जनजागृती करण्यासाठी स्वीप अंतर्गत संपूर्ण जिल्हाभरात अत्यंत मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम घेण्यात आले यासाठी स्वीप नोडल अधिकारी अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे यांनी उत्कृष्ट नियोजन करून ज्या ठिकाणी लोकसभा निवडणुकांमध्ये कमी मतदान झालेले आहे अशा ठिकाणीही मतदार जागृती मोहीम राबवली. शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जनजागृती मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले. संपूर्ण जिल्हाभरात अत्यंत चोखपणे मतदार जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आल्यामुळे सन 2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये 64.59 टक्के मतदान झालेले होते तर यावर्षी 20 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्ह्यात 67.72% मतदान झाले मतदानाच्या एकूण टक्केवारी जवळपास तीन टक्के वाढलेली दिसून आली.

विधानसभेला लोकसभा निवडणूक 2024 पेक्षा अधिक मतदान केंद्र ची संख्या झाली. विधानसभेला एकूण 11 विधानसभा मतदारसंघात 3738 मतदान केंद्रे होती. या सर्व मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार किमान पायाभूत सोयीसुविधाचे निर्मिती केलेली होती. मतदाराला मतदान केंद्रावर येऊन सहज मतदान करता येईल या पद्धतीने मतदान केंद्राची निवड करण्यात आलेली होती तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी आवश्यक सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या होत्या. एकूण मतदान केंद्राच्या जवळपास 60 टक्के म्हणजेच 2305 मतदान केंद्रावर वेब कास्टिंग ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती. या सुविधेमुळे संबंधित मतदान केंद्रावर कशा पद्धतीने मतदान केंद्राध्यक्ष व केंद्र अधिकारी मतदानाची प्रक्रिया राबवत आहेत याची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात जिल्हाधिकारी स्वतः पहात होते व आवश्यक त्या ठिकाणी निर्देश देत होते.

सी-व्हिजील कक्षात निवडणुकीच्या अनुषंगाने आलेल्या तक्रारीवर कक्षाच्या वतीने वेळेत तक्रारी संबंधितांपर्यंत पोहोचवून त्याचा निपटारा करण्यात आला. या कक्षाचे नोडल अधिकारी आशिष लोकरे यासाठी सातत्याने लक्ष ठेवून होते. तसेच विधानसभा स्तरावरील सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे होणारे रिपोर्टिंग मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांना कळविण्यासाठी महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी अत्यंत जबाबदारपूर्वक काम केले. तसेच जिल्हास्तरावर सर्व यंत्रणांनी विधानसभा स्तरावरील निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांच्या अधिनस्त यंत्रणांना पूरक कामकाज करून ह्या निवडणुका यशस्वीपणे पार पाडण्यात सहकार्य केले. प्रत्येक यंत्रणेला दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडून हा लोकशाहीचा उत्सव मोठ्या थाटात साजरा होण्यास प्रत्येकाने आपल्या परीने वाटा उचलला.

प्राथमिक आरोग्य आणि भोजनाची सुविधा:-
मतमोजणी परिसरात एखादी आरोग्याची समस्या उद्भवली तर त्यावेळेस त्याच्यावर ताबडतोब प्राथमिक उपचार करण्याकरता प्राथमिक उपचार किट तसेच ॲम्बुलन्सची व्यवस्था मतमोजणी परिसरात करण्यात आली होती. परिसरात चहा, अल्पोहार आणि भोजन व्यवस्था ठेवण्यात आली होती. त्यामुळे कुठलाही प्रकारचा तणाव हा कर्मचारी अधिकारी आणि निवडणूक उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींवर आला नाही. या संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेसाठी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना ही आरोग्य व चहापाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली होती. सोलापूर मनपाच्या स्वच्छता विभागाकडून सातत्याने परिसराची स्वच्छता करण्यात येत होते.

पोलीस सुरक्षा व्यवस्था :
मतमोजणी ही शांततेत व सुरळीत पार पडावी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण सुरक्षा व्यवस्था, आग प्रतिबंधक सुविधा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. प्रत्येक मतमोजणी कक्षात, पुरेसा वीज पुरवठा व जनरेटर बॅकअप सुविधा देण्यात आली होती. मतमोजणी कक्ष आणि परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले होते. चोख सुरक्षा व्यवस्थेमध्ये मतमोजणी निर्विघ्नपणे पार पडले.

मतमोजणी केंद्रावर राखीव कर्मचाऱ्यांची नियुक्ती :
मतमोजणी कामाकरिता राखीव अधिकारी आणि कर्मचार्यांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच स्ट्रांग रूममधून मतमोजणी कक्षामध्ये मतदान यंत्र पोहोचविण्यासाठी कलर कोडींग केलेले कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मतदान यंत्र नेण्यात येत होते.

 

जिल्हा व विधानसभा निहाय माध्यम कक्षाची स्थापना:-
मतदानाच्या दिवशी जिल्हास्तरीय माध्यम कक्ष जिल्हा नियोजन भवन येथून सुरू होते तर प्रत्यक्ष मतमोजणी दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व्हीआयपी सभागृह येथून जिल्हास्तरीय माध्यम कक्षाचे कामकाज सुरू होते. अकरा विधानसभाच्या माध्यम कक्षाच्या नोडल अधिकारी यांच्याकडून माहिती घेऊन पत्रकारांना देण्यात येत होती. त्याप्रमाणेच विधानसभा स्तरावर पत्रकारांसाठी देखील अकरा मतमोजणी केंद्रावर पत्रकार कक्ष उभे करण्यात येऊन एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती. या कक्षामध्ये चहा, शुद्ध पाणी आणि भोजनाची व्यवस्था ठेवण्यात आली होती. या पत्रकार कक्षामध्ये दूरचित्रवाणी, इंटरनेट सुविधा, झेरॉक्स, संगणक, प्रिंटर अशा सर्व सुविधा पत्रकारांना पुरवण्यात आल्या. तसेच सर्व संबंधित मतदार संघातील फेरी निहाय येणारी आकडेवारी व्हाट्सअप ग्रुपवर पाठविण्याबरोबरच त्याची फेरी निहाय प्रत्यक्ष प्रत पत्रकारांना देण्यात येत होती.त्यामुळे पत्रकारांना अचूक आणि वेळेवर वार्तांकन करण्यासाठी मदत झाली.
अशा उत्कृष्ट सुविधामुळे संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया उत्तमरित्या संपन्न झाली. याबाबत पत्रकारांनी कर्मचाऱ्यांनी आणि उमेदवाराच्या प्रतिनिधी देखील समाधान व्यक्त केले. सेवा सुविधा अधिक पुरवल्या की प्रत्येकाला काम करण्याची ऊर्जा मिळते. या हेतूने जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या संकल्पनेतून या दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी यांना मतमोजणी दिवशी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी कर्मचारी यांना चांगल्या सुविधा देण्याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आले होते. तसेच त्या सुविधा व्यवस्थितपणे दिल्या जात आहेत का नाही याची खात्री केली जात होती.
त्यामुळे 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी आठ वाजता सर्व 11 विधानसभा मतदारसंघात मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली प्रथम पोस्टल मताची मोजणी करण्यात आली त्यानंतर ईव्हीएम मशीन मधील मतांची मोजणी करून फेरीनिहाय निकाल जाहीर करण्यात येत होते. जाहीर झालेल्या निकालाची प्रत तात्काळ माध्यम कक्षा देण्यात येत होती. जवळपास सर्व विधानसभा मतदारसंघात मतमोजणी प्रक्रिया वेळेत पूर्ण होऊन विजयी उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक निरीक्षक यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र दिले. लोकसभा निवडणूक 2024 प्रमाणेच जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शन व नियंत्रणाखाली विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत मतदान व मतमोजणी सह सर्व निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पाडल्यामुळे जिल्हा प्रशासनाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

सुनील सोनटक्के
जिल्हा माहिती अधिकारी सोलापूर

Tags: Assembly election 2024Collector ashirwadVidhansabha election 2024
SendShareTweetSend
Previous Post

भाई ! इन्होने तो दिल जीत लिया ! दक्षिण मध्ये यांना नडला ओवर कॉन्फिडन्स ; काडादींची या नेत्यांनी लावली वाट

Next Post

मनीष व रोहन यांना घेऊन आमदार सुभाष बापू देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
मनीष व रोहन यांना घेऊन आमदार सुभाष बापू देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला

मनीष व रोहन यांना घेऊन आमदार सुभाष बापू देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला

ताज्या बातम्या

सोलापुरात महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांची बैठक; आगामी महापालिका निवडणुकीसाठी बांधली वज्रमूठ

सोलापुरात महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांची बैठक; आगामी महापालिका निवडणुकीसाठी बांधली वज्रमूठ

20 November 2025
अजितदादा बाळराजेंना पदरात घ्या ; राजन पाटलांकडून दिलगिरी व्यक्त

अजितदादा बाळराजेंना पदरात घ्या ; राजन पाटलांकडून दिलगिरी व्यक्त

19 November 2025
अनगर मध्ये राजन पाटलांचे निर्विवाद वर्चस्व, उज्वला थिटे यांचा अर्ज बाद ; प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील अनगर च्या पहिल्या नगराध्यक्षा; ; बाळराजे यांनी अजित पवारांना हिणवले!

अनगर मध्ये राजन पाटलांचे निर्विवाद वर्चस्व, उज्वला थिटे यांचा अर्ज बाद ; प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील अनगर च्या पहिल्या नगराध्यक्षा; ; बाळराजे यांनी अजित पवारांना हिणवले!

18 November 2025
सोलापुरात आय टी पार्कचा मार्ग मोकळा ; दीड वर्षात होणार पार्क ; जिल्हाधिकाऱ्यांनी ही दिली माहिती

सोलापुरात आय टी पार्कचा मार्ग मोकळा ; दीड वर्षात होणार पार्क ; जिल्हाधिकाऱ्यांनी ही दिली माहिती

18 November 2025
सोलापुरात भाजपने काँग्रेसचे प्रभाग फोडले ; बाबा मिस्त्री तौफिक शेख यांना आणले आमने-सामने

‘काळे’च का रे बाबा ! तेव्हा राजेश आता नरेंद्र

17 November 2025
भाजपच्या नरेंद्र काळे यांना धक्का ; ओबीसी महिलेसाठी आरक्षित, हरकती दरम्यान आयुक्तांशी “तू तू मैं मैं” ;  पहा कोणते प्रभाग झाले ओबीसी अन् सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित

भाजपच्या नरेंद्र काळे यांना धक्का ; ओबीसी महिलेसाठी आरक्षित, हरकती दरम्यान आयुक्तांशी “तू तू मैं मैं” ; पहा कोणते प्रभाग झाले ओबीसी अन् सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित

17 November 2025
उज्वला थिटे पहाटेच अनगर मध्ये दाखल ; फोटो, व्हिडिओ आले समोर

उज्वला थिटे पहाटेच अनगर मध्ये दाखल ; फोटो, व्हिडिओ आले समोर

17 November 2025
सोलापुरात भाजपने काँग्रेसचे प्रभाग फोडले ; बाबा मिस्त्री तौफिक शेख यांना आणले आमने-सामने

सोलापूर महापालिका निवडणुकीचे आरक्षण पुन्हा निघणार ; निवडणूक आयोगाचे आदेश

15 November 2025

क्राईम

‘वाँटेड अन् काल्या’ला पोलिसांनी हाकलले सोलापूरच्या बाहेर !

‘वाँटेड अन् काल्या’ला पोलिसांनी हाकलले सोलापूरच्या बाहेर !

by प्रशांत कटारे
14 November 2025
0

'वाँटेड अन् काल्या'ला पोलिसांनी हाकलले सोलापूरच्या बाहेर ! सोलापूर शहर पोलिसांनी तडीपारीच्या दोन कारवाया केल्या आहेत. अनेक गुन्हे दाखल असलेल्या...

दक्षिण सोलापूरचा विस्तार अधिकारी अँटीकरप्शनच्या  ताब्यात  ; रस्त्याच्या बिलासाठी घेतली दोन हजाराची लाच

दक्षिण सोलापूरचा विस्तार अधिकारी अँटीकरप्शनच्या  ताब्यात  ; रस्त्याच्या बिलासाठी घेतली दोन हजाराची लाच

by प्रशांत कटारे
30 October 2025
0

दक्षिण सोलापूरचा विस्तार अधिकारी अँटीकरप्शनच्या  ताब्यात  ; रस्त्याच्या बिलासाठी घेतली दोन हजाराची लाच   सोलापूर : दक्षिण सोलापूर पंचायत समितीतील...

सोलापुरात हत्तुरे फॅमिलीला धक्का ; महापालिकेपूर्वी मैनुद्दीन तडीपार

सोलापुरात हत्तुरे फॅमिलीला धक्का ; महापालिकेपूर्वी मैनुद्दीन तडीपार

by प्रशांत कटारे
18 October 2025
0

सोलापुरात हत्तुरे फॅमिलीला धक्का ; महापालिकेपूर्वी मैनुद्दीन तडीपार सोलापूर महानगरपालिका निवडणुकीपूर्वी शहरातील हत्तुरे फॅमिलीला मोठा धक्का बसला असून नगरसेवक पदासाठी...

अभिषेक कदम खूनप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या तालुकाध्यक्षास जामीन

जन्मठेप शिक्षा झालेल्या आरोपीला उच्च न्यायालयात जामीन मंजुर

by प्रशांत कटारे
14 October 2025
0

जन्मठेप शिक्षा झालेल्या आरोपीला उच्च न्यायालयात जामीन मंजुर सारोळे ता. बार्शी येथे पत्नी मिनाक्षी साबळे हिचा खुन केल्याच्या आरोपावरुन जन्मठेप...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

November 2025
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
« Oct    

Our Visitor

1919610
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group