सोलापूरचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा रद्द? काय आहे कारण
सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या लाभार्थी महिलांना भेटण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे तीनही प्रमुख नेते महिला सक्षमीकरण या कार्यक्रमांतर्गत सोलापूरला येणार होते त्यासाठी जिल्हा प्रशासनाने अतिशय भव्य दिव्य अशी तयारी केली आहे.
फडणवीस आणि पवार हे दोन्ही नेते सोलापुरात दाखल झाले आहेत मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर दौरा रद्द झाल्याची माहिती मिळत आहे त्यांची तब्येत बरी नसल्याने त्यांचे सर्व दौरे आणि मंत्रिमंडळ बैठक सुद्धा रद्द झाल्याचे प्रादेशिक वाहिनीवरून बातम्या प्रसारित होऊ लागल्या आहेत.
सोलापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे. त्यांच्या हस्ते जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन ही होणार होते परंतु हा दौरा रद्द झाल्याची माहिती मिळत असल्याने शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह पसरल्याचे बोलले जात आहे.