‘शहर मध्य’मध्ये बाबा मिस्त्रींना आमचा विरोध नाही ! अरिफ शेख -शकील मौलवी यांनी स्पष्ट सांगितले
सोलापूर : काँग्रेसचे माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, रूग्नसेवक बाबा मिस्त्री यांच्या यांना शहर मध्य या मतदारसंघातून काँग्रेस पक्ष उमेदवारी देणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यांच्या नावाची घोषणाही होईल अशी शक्यता वर्तवली जाते.
एकीकडे असे असताना दुसरीकडे शहर मध्य हा मुस्लिम समाजाला सुटला पाहिजे अशी मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे पक्षाने या मतदारसंघात बाबा मिस्त्री यांना उमेदवारी देण्याची निश्चित केल्याचे समजते पण मुस्लिम समाजातील काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे यांना भेटून आपल्या भावना मांडल्या. त्यानंतर मात्र बाबा मिस्त्री यांना मुस्लिमच्या नेत्यांचा विरोध असल्याच्या बातम्या छापून आल्या त्यानंतर समाजात गोंधळ उडाला आहे.
शहर मध्य मधील इच्छुक आणि माजी महापौर आरिफ शेख आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शकील मौलवी यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना बाबा मिस्त्री यांना आमचा कोणताही विरोध नाही. हा मतदारसंघ मुस्लिम समाजाला सुटला पाहिजे. हीच आमची प्रमुख मागणी आहे. त्यामुळे पक्षाने योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.