मुख्य सचिव नितीन करीर यांनी केले सिईओ मनिषा आव्हाळे यांच्या कामाचे कौतुक ..!
रे नगर मधील “माॅडेल अंगणवाडी” एकदा पाहण्यासारखी
सोलापूर – कुंभारी मधील रे नगर येथे उभारणेत आलेल्या १५ हजार घरकुलाच्या
वसाहती मध्ये उभारणेत आलेल्या “माॅडेल अंगणवाडी केंद्रा” चे उत्कृष्ठ कामा बद्दल राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी सिईओ मनिषा आव्हाळे यांचे कामाचे कौतुक केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते या वसाहतीचे लोकार्पण करणेत आले. या घरकुला मध्ये राहणे साठी येणारे नागरिकांच्या मुलांसाठी सिईओ मनिषा आव्हाळे यांनी आपल्या कल्पकतेतून माॅडेल अंगणवाडी केंद्र उभारले आहे. या माॅडेल अंगणवाडी केंद्रास पंतप्रधान यांचे भेटी प्रसंगी राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी भेट देऊन पाहणी केली. या अंगणवाडी चे कामाबद्दल सिईओ मनिषा आव्हाळे यांचे अभिनंदन केले आहे.
या माॅडेल अंगणवाडी केंद्रात
महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर रे नगर – कुंभारी “मॉडेल अंगणवाडी केंद्र ” उभारणेत आले आहे. पंतप्रधान भारत सरकार यांचा महत्त्वांकाक्षी गृहप्रकल्प असणारे रे नगर कुंभारी येथे उभारणेत आले आहे. पहिल्या टप्यात लोकार्पण झालेल्या या 15 हजार घरकुलांतील बालके व मातांसाठी एकात्मिक बालविकास सेवा योजना पुरविण्यासाठी 40 अंगणवाडी केंद्र व त्यांची बांधकामे जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 च्या निधीतून नव्याने मंजूर करणेत आली आहेत.
खाजगी नर्सरींचा लाभ केवळ सधन परिवारांनाच मिळतो. त्याच धर्तीवर बिडी कामगारांच्या बालकांना व महिलांना सर्वदृष्ट्या सक्षम असणारी अंगणवाडी उपलब्ध होणेसाठी मॉडेल अंगणवाडी केंद्र योजनेची मांडणी सिईओ मनिषा आव्हाळे यांनी केली आहे. म्हाडा चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल व विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी देखील पाहणी करून कौतुक केले आहे.
सिईओ मनिषा आव्हाळे यांचे मार्गदर्शना खाली महिला व बालविकास विभागाकडील जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले , बालविकास प्रकल्प अधिकारी विशाल भोसले , विस्तार अधिकारी सांख्यिकी श्रीकांत मेहेरकर व ऋषिकेश जाधव , अंगणवाडी पर्यवेक्षिका अनुराधा सोनकांबळे , अंगणवाडी सेविका श्रीम जावळे , श्रीम पारशेट्टी यांनी रे नगर अंगणवाडी केंद्राचे रूपांतर मॉडेल अंगणवाडी मध्ये केले आहे. सिईओ मनिषा आव्हाळे यांचे संकल्पनेतून ही माॅडेल अंगणवाडी केंद्र तयार करणेत आले असून फाईव्ह स्टार असलेली अंगणवाडी बिडी कामगारांचे मुलांसाठी पर्वणी असणार आहे.
यासाठी विशेष निधीची आवश्यकता भासल्याने जिल्हा परिषद उपकर निधीतून निधीची तरतूद करणेत आली आहे. मॉडेल अंगणवाडी केंद्र अंतर्गत विविध बाबींनी परिपूर्ण असे अंगणवाडी केंद्र करणेबाबत नियोजन करणेत आले आहे.
अंगणवाडीत बोलक्या भिंती
बालकांच्या शारिरीक, भावनिक, मानसिक विकासाच्या दृष्टीने पूर्व शालेय संच, खेळासाठी मैदान व शारिरीक विकासासाठीच्या खेळणी /साहित्य, ई लर्निंग साहित्य, हवेशीर अंगणवाडी केंद्र, पर्यावरण पूरक अंगणवाडी केंद्र, बालस्नेही शौचालय उभारणेत आले आहे. या साठी एकाचवेळी दोन दरवाजे उघडती येणेची सोय करणेत आली आहे. बालक आत अडकलेस आंगणवाडी सैविकेस सहज निरीक्षण करता येते.
अदययावत व बाल-माता स्नेही स्वयंपाकगृह करणेत आले आहे. वाढ निरीक्षण साधने, प्रथमोपचार सुविधा, स्वच्छ भारत संच, शोषखडडा, परसबाग, आईचा कटटा आदी विविध नाविण्यपुर्ण बाबी करणेत आले आहेत. यासाठी जिल्हा परिषद सेस फंडातून निधीची तरतूद करण्यात आली आहे.
प्रत्यक्षात अंमलबजावणी करणे साठी सिईओ मनिषा आव्हाळे यांनी खुप काळजी घेतली आहे.
जिल्हा वार्षिक योजनेच्या र रु 11,25,000/- निधीमधून अंगणवाडी बांधकाम पूर्ण करून घेतले.
जिल्हा परिषद उपकर निधी सन 2023-24 मधून रक्कम रु 7.00 लक्ष ची तरतूद मंजूर केली.
मॉडेल अंगणवाडी केंद्र, स्वच्छ व सुंदर तसेच बालकांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने परिपूर्ण होणेसाठी बाबी प्रत्यक्षात उतरवल्या.
बाला संकल्पनेतील बोलक्या भिंती अंगणवाडीच्या आतील व बाहेरील भिंती बालकांची मानसिकता लक्षात घेवून रंगविण्यात आल्या.
शारिरीक/भावनिक/मानसिक विकासात्मक पूर्व शालेय संच विविध आकार ओळखणे फळे/फुले/वाहने/प्राणी इ ओळख होणेसाठी कार्डसंच, आठवडयातील वार, इंग्रजी अक्षरे, अंक ओळख, विविध हावभाव युक्त फेसमास्क, बाहुलीघर इ. समावेश असणारा पूर्व शालेय संच उपलब्ध करून देण्यात आला.
खेळासाठी मैदान व उपक्रमासाठी साधने उपलब्ध केली आहेत. बालकांच्या शारिरीक विकासासाठी सुरक्षा चौहो बाजूने भिंत घेऊन आत मैदान उपलब्ध करून दिले. त्यामध्ये घसरगुंडी, झोका, सी- सॉ उपलब्ध करून दिले. ई लर्निंग साहित्य बालकांच्या आकलन क्षमतेमध्ये वाढ होणेसाठी अंगणवाडी केंद्रास स्मार्ट टीव्ही, बालक स्नेही सॉफ्टवेअर युक्त पेन ड्राईव्ह उपलब्ध करून दिला आहे. हवेशीर अंगणवाडी हवेशीर अंगणवाडी होणेसाठी खिडकयांची उंची कमी करून बालकांसाठी बैठक खिडकी तयार केल्या आहेत. खिडक्यांच्या गजांमध्ये स्टीलच्या विविध आकाराचे रिंग अडकविल्या आहेत.
बाल स्नेही बालकांना स्वच्छतागृह
……………………
लहान बालकांना या वयात स्वच्छतेची सवय लागणेसाठी विशेष दरवाजाच्या (वरच्या व खालच्या बाजूस अर्धा अर्धा दरवाजा उघडणारे) बेबी स्वच्छतागृहा चा सेटअप तयार करणेत आला.
सर्व सुविधायुक्त स्वयंपाकगृह धूरमूक्त अंगणवाडी संकल्पनेंतर्गत अंगणवाडी केद्रास गॅस उपलब्ध करून दिला. कुकर, वॉटर फिल्टर, ताट, वाटी,चमचे, स्टोरेज साठी डबे व धान्यकोठी अशा प्रकारे किचन सेट उपलब्ध करून दिला आहे.
प्रथमोपचार सुविधा: अंगणवाडी केंद्रासाठी परिपूर्ण असा First Aid Kit उपलब्ध करून दिला. वाढ निरीक्षण साधने : बालकांचा व प्रोंढाचा वजनकाटा,उंची मोजणे साठी सुविघा साहित्य उपलब्ध करून दिले आहे.
स्वच्छ भारत किट: स्वच्छ भारत कीट अंतर्गत हँडवॉश, वॉशबेसीन उपलब्ध करून दिले आहे.
पर्यावरण पूरक अंगणवाडी :- पर्यावरण पूरक अंगणवाडीसाठी जास्त ऑक्सीजनयुक्त झाडांची लागवड केली आहे.
सर्व भौतिक सुविधांनी सुसज्ज अंगणवाडी
……,…………
अंतर्गत अंगणवाडी केंद्रास टेबल खुर्ची, फलोअर मॅट, बालकांना शिकविणे साठी फळा उपलब्ध करून देणेत आसा असून त्यास स्टॅन्ड असून. फिरता फळा हा या केंद्रांचे आकर्षण आहे. किचन साठी स्टोरेज, किचन, बेबी टॉईलेट इ. बाबी उपलब्ध करून दिल्या आहेत.
कृतीयुक्त शिक्षणावर भर अंतर्गत घडयाळातील काटा फिरविणे, बॉल सरळ रेषेत फेकणे, बॉलने खेळणी पाडणे, सरळ रेषेवर चालणे इ कृतींचे साहित्य उपलब्ध करून दिले. परसबाग करणेत आली असून अंगणवाडीच्या उजव्या बाजूस उपलब्ध जागेमध्ये परसबाग नियोजन केले आहे.
आईचा कटटा करणेत आला असून अंगणवाडीच्या समारील डाव्या बाजूस आईच्या कटटयाचे नियोजन केले आहे.
सरपंचानी घेतली शपथ ..!
……………..
माढा तालुक्यातील पडसाळी येथीस सरपंचांनी फलकावर सही करून गावातील अंगणवाडी माॅडेल करणेची शपथ घेतली आहे. माजी सभापती विजयराज डोंगरे यांचे सह विविध पदाधिकारी यांनी या अंगणवाडीस भेटी दिले आहेत.