कुचन प्रशालेत वह्या वाटप | बावनकुळे यांच्या वाढदिनी अक्षय अंजिखाने यांचा उपक्रम
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाढदिवसानिमित्त अक्षय अंजिखाने मित्र परिवाराच्या वतीने कुचन प्रश्नाला येथे वह्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे मुख्याध्यापक युवराज मेटे यांनी केले. या प्रसंगी त्यांनी प्रमुख मान्यवरांचे स्वागत करत अक्षय अंजिखाने मित्र परिवाराचे आभार मानले.
या कार्यक्रमाप्रसंगी माजी महापौर श्रीकांचना यन्नम, पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास क्यातम,भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य हेमंत पिंगळे,सोलापूर विद्यापीठ सिनेट सदस्य संजय साळुंखे,भाजपा प्रदेश निमंत्रित सदस्य सागर अतनुरे,यतिराज होनमाने,विश्वनाथ दुर्लेकर,बाबुराव क्षीरसागर,ओंकार होमकर, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजक युवा नेते अक्षय अंजिखाने म्हणाले ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा कार्यक्रम आयोजित केला ते चंद्रशेखर बावनकुळे यांचा जीवन प्रवास हा संघर्षमय असून रिक्षा चालक ते जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री पदापर्यंत मजल मारताना त्यांनी सामान्य नागरिकांच्या व प्रकल्प ग्रस्त लोकांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला. याचं लोकांच्या प्रेमामुळे आज यांना इतके मोठे फळ मिळाले असून आपण ही उद्या शिक्षण घेऊन मोठ्या पदावर गेल्यावर गोर गरीब लोकांना केंद्रबिंदू मानून काम करावे ही अपेक्षा व्यक्त करतो असे प्रतिपादन केले.
संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास क्यातम यांनी अक्षय अंजिखाने यांचे आभार मानत म्हनाले की बावनकुळे यांच्या व्यक्तिमत्वाला साजेशा असा उपक्रम आपण आयोजित केला असून, संस्थेच्या वतीने बावनकुळे साहेबाना दीर्घ आयुष्य लाभावा ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी महापौर
श्रीकांचन यन्नम यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी बावनकुळे यांच्या सारखे कर्तुत्ववान बनावे अशी अपेक्षा व्यक्त करत या दिलेल्या वह्यांचा उपयोग आपल्या शैक्षणिक जीवनात आपणास भरगोस यश संपादन करण्यासाठी व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.