सोलापूर : भाजप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सोलापूर शहर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पंढरपुरात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी माढा लोकसभा मतदारसंघासाठी मोहिते पाटील तसेच विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यात वाद सुरू असून यावर त्यांचे प्रतिक्रिया विचारली.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी मोहिते पाटील व निंबाळकर यांच्यात मतभेद आहेत परंतु मनभेद नाहीत त्यामुळे पक्षाला कोणतीही अडचण येणार नाही. उलट खासदार निंबाळकर यांनी आपल्या साडेचार वर्षाच्या कार्यकाळात या मतदारसंघातील 40 वर्षाचा बॅकलॉग भरून काढला आहे असे सांगून एक प्रकारे निंबाळकर यांची पाठराखण केल्याचा पाहायला मिळालं. दुसरीकडे सोलापूरच्या खासदाराबाबत त्यांची ही नाराजी दिसून आली. परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याणकारी योजना मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचल्या असे सांगत डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. पहा नक्की काय म्हणाले बावनकुळे…