आधार हॉस्पिटल म्हणजे सोलापूरचे वैभव ; जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे गौरवोद्गार
सोलापूर : सोलापुरातील विजापूर रोडवरील सैफुल भागात नव्याने उभारण्यात आलेल्या आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटलचे उद्घाटन राज्याचे मृदू व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते शनिवारी मोठ्या थाटात संपन्न झाले.
आधार हॉस्पिटल मुळे सोलापूरच्या वैभवात भर पडली असून या ठिकाणी गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांना चांगली वैद्यकीय सुविधा मिळेल यात शंका नाही. केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य विषयक सर्व योजना या हॉस्पिटलने राबवाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. लवकरच 100 बेडचे हॉस्पिटल उभे करून मला पुन्हा उद्घाटनाला बोलवा असे सांगत या हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश राठोड, डॉक्टर शितल राठोड व युवराज राठोड यांच्या कार्याचे कौतुक मंत्री संजय राठोड यांनी केले.
या उद्घाटन सोहळ्याला आमदार देवानंद चव्हाण, भीमराव राठोड, नितीन तोष्णीवाल, नगराध्यक्ष बाबू राठोड, जुगनू महाराज, बापू राठोड, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अन्नप्पा सत्तुबर, शिवसेना शहर प्रमुख सचिन चव्हाण यांच्यासह मान्यवरांची मोठी उपस्थिती होती. प्रारंभी डॉक्टर योगेश राठोड यांनी प्रास्ताविकात उपस्थित आमचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी माने यांनी केले. या कार्यक्रमानंतर मंत्री संजय राठोड यांनी युवराज राठोड यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.