Breaking : सोलापुरात वीज पडून झाड जळून खाक
सोलापुरात बुधवारी मोठ्या आवाजात आभाळात गडगडाट होवून विजा चमकून अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे अनेक ठिकाणची वीज देखील गेली आहे. मात्र हा अवकाळी पाऊस सुरू असतानाच निराळे वस्ती रोड वरील जुना हिरज नाक्या जवळ हजरत खान चाळ समोरील एका बंगल्याच्या आवारात वीज कोसळली.
सदर ठिकाणी नारळाचे झाड असल्याने सुदैवाने घरावर काही न होता झाड मात्र जळाले…वीज कोसळताना प्रचंड असा आवाज आला आणि वीज पडली त्यामुळे परिसरातील लोक घाबरून घरा बाहेर आले. यावेळी महावितरण कडून सुरक्षा म्हणून वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.