सोलापूर : काँग्रेस कमिटीच्या सोलापूर शहर अध्यक्षपदी माजी गटनेते चेतन नरोटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचे पत्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते मुंबईत आज दुपारी बारा वाजता देण्यात आले.
यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आमदार प्रणिती शिंदे माजी नगरसेवक विनोद भोसले यांच्यासह इतर कार्यकर्ते व चेतन नरोटे समर्थकांची उपस्थिती होती. नरोटे यांची काँग्रेसच्या प्रभारी शहराध्यक्षपदी ही निवड झाली आहे.
काँग्रेसचे विचार सोलापूर शहरात तळागाळापर्यंत पोहोचवून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करा अशा सूचना प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी केल्या. ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपले काम राहील, आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत निश्चित काँग्रेस पक्षाला यश मिळवून देण्यासह पक्ष संघटन मजबूत करण्याची ग्वाही नूतन अध्यक्ष नरोटे यांनी दिली.



















