सोलापूर : देशातील 8 राज्यांमध्ये पीएफआयच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात येत आहेत. तसेच अनेक पीएफआय सदस्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
दरम्यान महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि सोलापूरमधूनही पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना एटीएस आणि एनआयएने ताब्यात घेतले आहे.
तर ठाण्यातून 4 आणि कल्याण, भिवंडीतून प्रत्येकी एक- एक कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
चौकशीनंतर पोलिसांनी त्या व्यक्तीस न्यायालयात नेले आहे. आसिफ शेख हा सोलापुरातील सहारा नगर येथे वास्तव्यास आहे.
आसिफ शेख हा पीएफआयचा पदाधिकारी असल्याचे सांगण्यात येत असून शिक्षण दहावी पर्यंत झालंय आणि तो फिश फ्रायचा गाडा चालवतो. अशी माहिती समोर आली आहे.



















