सोलापूर : सोमवारी शिक्षक संघटनेच्या आंदोलनात संघटनेचे नेते शिवानंद भरले यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी आणि शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर बाबत संविधानिक भाषा वापरून एकेरी उल्लेख केला होता. दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या शिक्षण विभागाच्या दशसूत्रीवर भाष्य करताना अन्यथा.., दशसूत्री ही कापडात गुंडाळून फेकून देऊ अशीही भाषा वापरली होती.
दरम्यान या घटनेचा महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेने तीव्र असा निषेध नोंदवला आहे. बुधवारपासून काम बंद करून याबाबतचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना दिले होते, शिवानंद भरले यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी सर्व आक्रमक दिसून आले. प्रशासनाने सुद्धा कारवाईसाठी पावले उचलली होती.
याच पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास स्वतः शिवानंद भरले, मच्छिंद्रनाथ मोरे हे संघटनेचे राज्याध्यक्ष बाळासाहेब मोरे यांच्या सोबत जिल्हा परिषदेत आले त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेतली झालेला प्रकार गैरसमजुतीतून झाल्याचे सांगत दिलगिरी व्यक्त करण्यात आली. पुन्हा जोमाने काम करण्याची ग्वाही दिली.
दरम्यान बाळासाहेब काळे यांनी सिंहासनशी बोलताना अधिक माहिती दिली. यापुढे आता सर्व शिक्षक जोमाने काम करून जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढवणार असल्याचे सांगितले..



















