सोलापूर : मुळेगाव रोडवरील गंगाई केकडे नगरात मध्यरात्री दीडच्या दरम्यान एका 35 वर्षीय इसमाचा खून झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नागरिकांकडून मिळालेली माहिती अशी की, केकडे नगरातील रहिवासी कोकणे यांच्या घरात मयत नारायणकर हे राहत होते, मंगळवारी नारायणकर हे आपल्या कुटुंबासह घरात झोपले असता मध्यरात्री दीडच्या दरम्यान त्यांना फोन आल्याने ते उठून घराच्या बाहेर गेले, याच दरम्यान अनोळखी इसमाने येऊन त्यांचा गळा आवळला आणि धारदार शस्त्राने त्यांचा गळा कापून खून केला.
पती येत का नाहीत म्हणून पत्नीने बाहेर येऊन पाहिले असता पती हे रक्ताच्या थारोळ्यात मारून पडले होते, आरडाओरडा करून शेजारी जमा झाले, त्यांनी त्वरित एमआयडीसी पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली, गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे यांनी ही घटनास्थळी भेट दिली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे.



















