सांगा करली मेंबर आम्ही राहायचे कसे ? तुमचा निधी गेला कुठे? इंगळे वस्ती येथील नागरिकांचा सवाल
सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील विशेष करून हद्दवाढ भागात नागरी सुविधा बाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. दक्षिणमधून इच्छुक असलेले सोमनाथ वैद्य यांनी हद्दवाड भागात मूलभूत सुविधांसाठी निधी देण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
या हद्दवाढ भागातील भारतीय जनता पार्टीचे माजी सभागृह नेते तथा आमदार सुभाष देशमुख यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे श्रीनिवास करली यांनी सोमनाथ वैद्य यांना पत्र देऊन पाठिंबा दर्शवला आहे. त्याच करली बाबत आता त्यांच्या प्रभागातील नागरिक प्रचंड नाराज आहेत.
नीलम नगर भागातील इंगळे वस्ती ते आशा मराठी शाळेकडे जाणाऱ्या रस्ता अतिशय खराब झालेला आहे. एक पाऊस जरी आला तर चिखल होऊन कोणतेही वाहने यावरून जात नाही. नागरिकांना चालत जाणे सुद्धा मुश्किल झाले आहे. वाहने घसरून पडल्याने अनेकांचे छोटे-मोठे अपघातही झाले आहेत. या चिखलातून वाट काढताना वृद्ध महिला यांचा तोल जाऊन अनेक जण जखमी झाले आहेत.
या भागातील नागरिकांनी नगरसेवकांच्या कारभारावर तीव्र अशी नाराजी व्यक्त केली आहे. सांगा श्रीनिवास करली आम्ही जायचे कसे? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. मुळात श्रीनिवास करले हे मागील अनेक वर्षांपासून भाजपचे नगरसेवक आहेत मागील काळात त्यांना सभागृह नेते पदाचे बक्षीस सुभाष देशमुख यांनी दिले मग सभागृह नेत्याचा निधी गेला कुठे? या भागाचे आमदार सुभाष देशमुख यांनीही दिलेला निधी गेला कुठे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.